shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पाथर्डी नगरपरिषदेने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेवर होत असलेल्या बेकायदा गटार बांधकामा बाबत अरविंद सोनटक्के यांचे उपोषण

सार्बजनिक बांधकाम उपविभाग,पाथर्डी यांचे टोलवाटोलवीची उत्तरे..

पाथर्डी:-दि.२४
दिनांक 21 जानेवारी 2025 पाथर्डी शेवगाव रोडवर नगरपरिषद पाथर्डी यांच्यामार्फत प्रवाहाच्या विपरीत दिशेला व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेवर बेकायदा होत असलेल्या गटार बांधकामाबाबत सामाजिक कार्यकर्ते अरविंद सोनटक्के यांनी बेकायदा बांधकाम होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी, नगरपालिका प्रशासन, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलेले होते परंतु त्यावर आज तागायत कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही.

       मस्तवाल अधिकारी फक्त कागदी घोडे नाचवण्याचे काम करत आहेत. पाथर्डी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक यांचे समक्ष लेखी पत्र देऊनही कारवाई होत नसल्यामुळे आज सकाळी 11 वाजेपासून कार्यकारी अभियंता (रोहयो) कार्य विभाग अहिल्यानगर यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसलेले आहेत. संध्याकाळी सात वाजेपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्यांची भेट न घेता उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.  उपोषणाच्या निमित्त काढून कार्यकारी अभियंता रजा टाकून निघून गेल्याचे चौकशी केली असता समजते .या बाबी वरून एक लक्षात येते की राजकीय हस्तक्षेप किती मोठ्या प्रमाणात झालेला असावा त्यामुळे  सोनटक्के यांनी सांगितले की जोपर्यंत ठेकेदारावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत उपोषण सोडले जाणार नाही.असे  आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
close