shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कुंभ मेळ्याच्या आधि श्रीक्षेत्र बहिरवाडी, पुणतांबा व प्रवरासंगम येथील गंगाघाटांचा विकास करा - मनोजकुमार आगे


 श्रीरामपूर / प्रतिनिधी:
 श्रीश्रेत्र नाशिक त्र्यंबकेश्वर येथे सन २०२७ मध्ये हिंन्दुचा पवित्र असा महाकुंभ मेळा होत आहे त्या आधि अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र बहिरवाडी, श्रीक्षेत्र पुणतांबा व श्रीक्षेत्र प्रवरासंगम (कायगाव टोका) येथील पवित्र गंगा नद्यांचे काठाचे - घाटाचे विकासाचे काम व्हावे आशी मागणी संपादक पत्रकार सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार मनोजकुमार आगे यांनी केली आहे . नुकताच त्यांनी नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र बहीरवाडी येथील श्रीकालभैरवनाथांचे दर्शन घेवून पुजा केली तेव्हा या बाबत बोलतांना श्री.आगे म्हणाले की, श्रीक्षेत्र बहीरवाडी (ता. नेवासा) येथे शेकडो वर्षापूर्वांचे श्री भगवान शंकराचे श्री कालभैरवनाथ रूप स्वयंभू शिवतीर्थ आहे.त्याचा मोठा धार्मिक इतिहास आहे तसेच दरवर्षी लाखो भाविक येथे यात्रेसाठी येतात . तसेच प्रवरासंगम जुने कायगांव टोका येथे श्री सिंध्देश्वर महादेवाचे पुरातण मंदिर आहे, प्रभु श्रीरामचंद्र यांनी सुवर्णमृग मारीच राक्षसाचा वध केला तो हा भाग, येथेही गोदावरी - प्रवरा -मुळा या तीन नद्यांच संगम असल्याने सिंध्देश्वर महादेव मंदिर व पलीकडे श्री रामेश्वर महादेव मंदिर येथे आजपर्यत कोट्यावधी लोकांचे अस्थी विसर्जन व दहाव्याचे कार्यक्रम झालेले आहेत व ही परंपरा शेकडो वर्षाची आहे . नदिकाठी हे दोन्ही पुरातन शिवमंदिर आहेत तर श्रीक्षेत्र पुणतांबा येथे श्री योगीराज चांगदेव महाराजांची १२०० वर्षा पूर्वीची समाधी आहे, ते निस्सीम शिवभक्त होते . येथेही गोदावरी नदीकाठी लाखो - कोटी दहाव्याचे कार्यक्रम झालेले आहेत ती परंपरा पुढे सुरु आहे . तसेच श्रीक्षेत्र गोदाधाम (सराला बेट ) येथेही श्रीसंत योगीराज गंगागीरीजी महाराज व संत गुरुवर्य नारायणगीरी जी महाराज यांची समाधी आहे येथील गगांगीरीजी महाराजांच्या सप्ताहाची मोठी परपंरा आहे त्यात लाखो भाविक सहभागी होतात.तेव्हा श्रीक्षेत्र नाशिक त्र्यंबकेश्वर येथे सन २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभ मेळ्यासाठी केंन्द्र सरकार व राज्य सरकार हजारो कोटींचा निधी देणार आहेत, काही निधी आला पण आहे, तेव्हा श्रीक्षेत्र बहीरवाडी (श्री कालभैरवनाथ ), श्रीक्षेत्र पुणतांबा (योगीराज संत चांगदेव महाराज ), श्री क्षेत्र प्रवरासंगम कायगाव टोका (श्री सिध्देश्वर व श्री रामेश्वर महादेव मंदिर ) व श्रीक्षेत्र गोदाधाम (सरालाबेट ) या ठिकाणी गोदावरी नदी चा काठ - घाट असून त्याचा मोठा विकास तातडीने विशेष निधी देवून करावा व धार्मिक पर्यटनाला चालना द्यावी . कारण देशात हिंन्दुचे मोदी सरकार आहे ! राज्यात हिंन्दुचे फडणवीस -शिंदे - पवार सरकार आहे तसेचे महामंडलेश्वर शांतीगीरीजी महाराज, गुरुवर्य भास्करगीरी महाराज, महंत रामगीरीजी महाराज यांचे आरएसएस चे मोहन भागवत, पंतप्रधान नरेंन्द्र मोदी,मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंन्दे, उपमुख्यमंत्री अजीत पवार, पालकमंत्री व जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याची अतिषय चांगले संबध आहेत.
तेव्हा या सर्व गुरूवर्यानी सरकारकडे गंगा नदी काठ व घाटाच्या विकास कामा करीता निधी मिळविण्यासाठी भुमिका घेतल्यास निश्चीतच या हजारो वर्षाचा धार्मिक इतिहास असलेल्या तिर्थक्षेत्राचा मोठा विकास होईल, कारण प्रवरा संगम येथे गोदावरीगंगा- मुळा - प्रवरा या तिन नद्यांचा संगम आहे ते तिर्थक्षेत्र म्हणजे महाराष्ट्रातील प्रयागराजच आहे असेही ज्येष्ठ पत्रकार मनोजकुमार आगे यांनी म्हटले आहे.

ज्येष्ठ पत्रकार मनोजकुमार आगे यांनी जागृत असलेल्या नेवासा तालुक्यातील तीर्थक्षेत्र बहिरवाडी येथे भेट दिली या प्रसंगी श्री कालभैरवनाथांचे पूजन करतांना टायसन मनोजकुमार आगे यांच्या समवेत श्री कालभैरवनाथ देवस्थानचे विश्वस्त बी.जी. मिटकरे, विश्वस्त दिनकर महाराज हारदे,विश्वस्त सीताराम पा.घोरपडे,पुजारी राजेंद्र नळघे, संजय नळघे दिसत आहे.

वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
close