shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सौ.कोमल पांडव या विदर्भाची हिरकणी पुरस्काराने सन्मानित


वरूड जि.अमरावती प्रतिनिधी:
श्री शिवाजी शिक्षण संस्था संचालित न्यू इंग्लिश प्रायमरी स्कुल वरुड जि. अमरावती याठिकाणी मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या सौ. कोमल पांडव यांना नुकताच कलाजिवन संस्थेतर्फे विदर्भाची हिरकणी पुरस्कार - २०२५ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सौ.पांडव यांचे शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही मोठे कार्य आहे.त्या सातत्याने आपल्या शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही विविध सामाजाभिमुख उपक्रम राबवून अविरत कार्य करत आहेत.त्यांनी या आधी अलेक्सा हे मॉडेल विद्यार्थाकरीता तयार केले आणि त्याची विद्यार्थ्यांनी माहिती तथा आनंद सुद्धा घेतला तसेच कोरोना काळात त्यांनी सामाजिक कार्यात अग्रेसर राहून महिलांना कोरोना लस घेण्याकरीता मोलाचे मार्गदर्शन व मदत केली. महागाईबाबत गॅस सिलिंडर, तेल इत्यादी घरेलु जीवनावश्यक वस्तूंचे दर  गगणाला भिडले असता त्यांनी महागाईविरोधात आवाज उठविला. यासोबतच शिक्षक भरती करण्याकरिता अनेकवेळा निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुढाकार घेतला यासोबतच महिलांसाठी जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सत्कार सन्मान, तसेच महिलांचे हेल्थ चेकप तपासणी शिबीरे घेऊन महिलांना सक्षम कसे करता येईल या करिता त्या सातत्याने कार्यरत असतात, त्यांच्या अशा या विविध सामाजाभिमूख उपक्रम आणी कार्यची दखल सामाजिक क्षेत्रातील नावाजलेली संस्था असलेल्या कलाजिवन संस्थेने घेत त्यांची हिरकणी - २०२५ या पुरस्कारा साठी निवड करून प्रमुख मान्यवरांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्यांना मिळालेल्या या पुरस्कारबद्दल सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
सौ.पांडव यांना मिळालेल्या पुरस्कारबद्दल त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, काम करत रहा, एक दिवस आपल्या कामाची दखल ही घेतली जातेच, आपण कामे करत असताना सामाज आपल्याकडे कटाक्षाने बघत असतो,तथा आपल्या चांगल्या - वाईट कामांचे मुल्यमापनही करत असतो,
त्याद्वारे काय चांगले आणी काय वाईट याचे फलस्वरुप पुढे निदर्शनास येवू लागते.
चांगले कामे असली तर त्याचे फळ देखील चांगलेच मिळतात हे यावरून स्पष्ट होते. करीता हा पुरस्कार माझा नसुन मला मिळालेल्या समाज कार्याच्या संधीचा आहे, त्या समाजसेवेचा आहे, एकारुपाने हा पुरस्कार म्हणजे माझ्या सामाजिक कामांची पावतीच होय असेही त्यांनी यावेळी  सांगितले.
वृत्त विशेष सहयोग
पत्रकार प्रविण सावरकर - 
वरुड

वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
close