shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामपूर शहरात कुष्ठरोग व क्षयरोग जनजागृती रॅली संपन्न

प्रांताधिकारी किरण सावंत, तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांनी बॅनर धरून रॅलीत  दिला जनजागृतीचा संदेश

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
सहाय्यक संचालक आरोग्यसेवा कुष्ठरोग अहिल्यानगर, जिल्हा आरोग्याधिकारी, इंडियन रेड क्रॉस सोसायटी श्रीरामपूर, उपजिल्हा रुग्णालय श्रीरामपूर, श्रीरामपूर तालुका आरोग्याधिकारी पंचायत समिती श्रीरामपूर आदींच्या संयुक्त विद्यमाने स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत व १०० दिवशीय क्षयरोग मोहिमे अंतर्गत श्रीरामपूर शहरातून भव्य कुष्ठरोग व क्षयरोग जनजागृती रॅली नुकतीच काढण्यात आली.

         आझाद मैदान येथून रॅली चा प्रारंभ रेड क्रॉस अध्यक्ष तथा प्रांताधिकारी किरण सावंत यांनी ध्वज उंचावून केला. कुष्ठरोग व क्षयरोग विषयक माहिती असणारे पोस्टर्सचा सहभाग रॅलीत होता.सजवलेल्या गाडीत विविध प्रकारची माहिती असणारे पोस्टर्स लावलेले होते.
               जिल्हा कुष्ठरोग पर्यवेक्षक संजय दुशिंग यांनी कुष्ठरोग तर क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रद्न्य शबाना खान यांनी माईक वर घोषणा दिल्या.रॅली छत्रपती शिवाजी रोड, मेनरोड, पुन्हा आझाद मैदान या मार्गे आली. रॅली मध्ये सेवा नर्सिंग स्कूल चे विद्यार्थी, डी. डी. काचोळे , भी. रा.खटोड कन्या विद्यालय, शा. ज. पाटणी विद्यालय आदी विद्यालयाचे एन. सी.सी. छात्र उपस्थित होते.
        रॅलीत अध्यक्ष तथा प्रांताधिकारी किरण सावंत उपाध्यक्ष तथा तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांनी कुष्ठरोग व क्षयरोग आजाराची माहिती असणारे बॅनर हातात पकडून पूर्ण रॅली मध्ये जनजागृतीचे काम केले ही बाब वैशिष्ट्यपूर्ण होती.
       रॅली मध्ये विद्यार्थी हातात फ्लेक्स पोस्टर्स, चित्रे, फलक उंचावून नागरिकांना आजाराची माहिती देत होते.
          रॅली समारोप प्रसंगी प्रांताधिकारी किरण सावंत यांनी जनजागृती बरोबरच दोन्ही आजार हद्दपार करण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
      रॅली यशस्वी पार पाडण्यासाठी प्रांताधिकारी किरण सावंत,तहसीलदार मिलिंद कुमार वाघ,सचिव सुनील साळवे,तालुका आरोग्याधिकारी डॉ.मोहन शिंदे, जिल्हा कुष्ठरोग पर्यवेक्षक संजय दुशिंग, वैद्यकीय सहाय्यक सुवर्णा जाधव, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक प्रकाश मेटकर,क्षयरोग उपचार पर्यवेक्षक आदिनाथ खरात,प्रयोगशाळा तंत्रद्न्य शबाना खान,पोपटराव शेळके,प्रवीण साळवे,श्रावण भोसले,सुरेश वाघुले,सचिन चंदन,साहेबराव रक्टे, पाटणी विद्यालय चेअरमन भरत कुंकुलोळ, खटोड कन्या विद्यालय चेअरमन दत्तात्रय साबळे,अवधूत कुलकर्णी,सुखदेव शेरे, सुरंजन साळवे,अरुण कटारे,बन्सी फेरवानी,
अमोल नलावडे,सुभाष बोधक,शिवाजी गोरे ,ज्ञानदेव माळी, डॉ.स्वप्नील पुर्णाले, भाऊसाहेब कवडे,दिलावर पठाण,प्राचार्य विठ्ठल भांगरे, प्राचार्य नंदा कानिटकर,एन. सी.सी.ऑफिसर गोरक्षनाथ आंबेकर, राकेश शिंदे, सोनाली पुंड,बाबासाहेब औटी,पुष्पा शिंदे,अनुप्रिती पवार, निर्मला लांडगे,स्वाती पुरे,शोभा शेंडगे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 956117111
close