अहिल्यानगर :-
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणीत पदोन्नती मिळाली आहे. या पदोन्नतीमध्ये राज्यातील सुमारे ९ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. असा आदेश राज्य शासनाच्या गृहविभागाने काढला आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांची पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
👉 *भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणीत पदोन्नती*
पोलीस अधीक्षक राकेश ओला हे २०१२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सलग तेरा वर्षे सेवा बजावल्यानंतर आयपीएस अधिकाऱ्यांना भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणीत पदोन्नती देण्यात येते. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी यापूर्वी श्रीरामपूर, मालेगाव येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून तर नागपूर शहर पोलीस उपायुक्त, नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक येथे कर्तव्य बजावले. सलग १३ वर्षे सेवा पूर्ण केल्याने त्यांची भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणीत पदोन्नती मिळाली आहे.
🪀 *अशाच अपडेटसाठी I❤️ नगरच्या 7798300400 मिस्ड कॉल द्या*

