श्रीरामपूर:-
नव स्वराज्य सेनेच्या वतीने येथील नगर परिषदेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करत त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नव स्वराज्य सेनेचे अध्यक्ष विजयराव खाजेकर यांनी प्रतिपादन केले की चारशे वर्षांपूर्वी ही संपूर्ण स्री जातीला सन्मानाने वागवत त्यांचे न्याय हक्क देणारा. नीती मूल्य युक्त स्वराज्याची स्थापना करताना जाती-धर्माच्या बेड्या अलगद तोडणारा आपल्या कर्माने व मानव धर्माने इतिहासाच्या पानात व रयतेच्या मनात युगायुगापर्यंत अविट छाप सोडणारा खरा जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय.
याप्रसंगी डॉ. अशोक शेळके, संजय वाव्हळ, रंगनाथ पितळे, अंतोन भरपूरे ,नाना शिंदे, भाऊसाहेब खरात, राजेंद्र हिवाळे सर, नंदकिशोर भलारे ,फिरोज पठाण, किसन वमने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

