shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुस्तपालन व लेखाकर्म उपासक प्रोफेसर संजीव कुमार अग्रवाल यांची निवड

सेनगांव/विश्वनाथ देशमुख   

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील तोष्णीवाल महाविद्यालयातील वाणिज्य विभागात विभाग प्रमुख म्हणून मागील ३१ वर्षापासून कार्यरत असलेले प्राध्यापक डॉ. संजीवकुमार अग्रवाल यांची नुकतीच वाशिम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या हिंगोली शाखेच्या सल्लागार मंडळाच्या सदस्य पदी निवड करण्यात आली.सदर निवड ही त्यांनी आतापर्यंत केलेल्या कार्याची एकप्रकारे पावतीच ठरते.डॉ. संजीवकुमार अग्रवाल हे मागील ३१ वर्षापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत या क्षेत्रात काम करत असताना त्यांचा आवडता विषय म्हणजे पुस्तपालन व लेखाकर्म हा असून याविषयी असलेले समर्पण वाखाणण्याजोगे आहे. इयत्ता अकरावी पासून एम कॉम पर्यंतचे या विषयाचे त्यांचे ज्ञान अद्वितीय तर आहेच परंतु सदर विषयात त्यांचे लिखाण सुद्धा अप्रतिम आहे आतापर्यंत त्यांनी लिखाण केलेल्या एकूण १२ संदर्भ ग्रंथांपैकी बहुतांश ग्रंथ हे लेखाकर्म  या विषयाचे आहेत. लेखाकर्मा नंतर शिक्षक व संशोधक या नात्याने त्यांचा दुसरा आवडता विषय म्हणजे बँकिंग त्यांनी आतापर्यंत या विषयाच्या अनुशंघाने प्रचुर लेखन देखील केलेले आहे





.त्यंनी लिहीलील्या एकूण ७० पेक्षा जास्त संशोधन निबंधापैकी बहुतांश निबंधाचा विषय हा बँक याच्याशी संबंधीत आहे, त्यासोबतच त्यांनी बँक या विषयावर यु.जी.सी. द्वारे अनुदान प्राप्त लघु संशोधन प्रकल्प देखील पूर्ण केला आहे. त्यांनी भविष्यात बँकिंग क्षेत्राची गरज व या क्षेत्रात आवश्यक कार्यकुशल मनुष्यबळ पुरविण्याच्या दृष्टीने तोष्णीवाल महाविद्यालयात बँकिंग व इन्सुरन्स या विषयातील एम.कॉम. हा अभ्यासक्रम सुरु करण्याच्या दृष्टीने आपले योगदान दिलेले आहे.आज पर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली १४ विद्यार्थ्यांनी पीएच.डी.चे संशोधन कार्य  पूर्ण केले आहे. सद्यस्थितीत बँकिंग क्षेत्र दुहेरी नियमावलीला सामोरे जात आहे एक म्हणजे महाराष्ट्र शासनाचा सहकार कायदा व दुसरा आरबीआयची नियम अशा या परिस्थितीत सहकारी बँक क्षेत्र चालवणे हे खडतर बनलेले आहे अशा प्रसंगी बँकिंग क्षेत्रात समर्पण भावनेतून संशोधन करणाऱ्या प्रा.डॉ.संजीवकुमार अग्रवाल यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा बँकेच्या उन्नतीसाठी होईल याची कल्पना संचालकांना आल्यानेच त्यांनी अग्रवाल यांची सल्लागार मंडळ सदस्य पदी निवड केलेली दिसून येते.यापूर्वी देखील त्यांनी अनेक विवध बँकेच्या संचालक पदी देखील आपली सेवा दिलेली आहे. त्यांच्या ह्या निवडीबद्दल महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा बहाल केल्या.

close