एरंडोल:- १३ फेब्रुवारी २०२५ –यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या वतीने विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची माहिती मिळावी याकरिता चलचित्रपती रथ आज एरंडोलच्या डीडीएसपी महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्रात दाखल झाला.
या उपक्रमाच्या माध्यमातून 5344 ए केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन मिळाले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या शिक्षणक्रमासोबतच नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती घेतली.विशेषतःअनेक विद्यार्थ्यांनी नवीन शिक्षणक्रमांविषयी उत्सुकता दर्शवली आणि सविस्तर माहिती मिळवली.
या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य व केंद्रप्रमुख डॉ. ए. जे. पाटील, उपप्राचार्य डॉ. अरविंद बडगुजर, प्रा. एन. ए. पाटील, केंद्र संयोजक प्रा. नितीन व्ही. पाटील, केंद्र सहाय्यक विशाल चव्हाण, केंद्र सेवक दिनेश पवार, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला असून, त्यांनी नव्या शैक्षणिक धोरणाविषयी अधिक जागरूकता मिळवली.



