shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भुसावळमध्ये भरदिवसा घरफोडी – पोलीस तपासात आरोपी गजाआड!

भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील फिरदोस इस्माईल बागवान यांच्या घरी भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना घडली. १० फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते २.३० दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून प्रवेश केला. त्यांनी बेडरूममधील कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण १.७२ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.

भुसावळमध्ये भरदिवसा घरफोडी – पोलीस तपासात आरोपी गजाआड!

या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात BNS 65/2025 कलम 331(3)या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान, पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.

पोलीस निरीक्षक राहुल वाघ, उपनिरीक्षक महेश जाधव आणि त्यांच्या पथकाने जलद कारवाई करत आरोपीचा शोध लावला. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस दलाचे कौतुक करण्यात येत आहे.



close