shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोल तालुक्यात गावठी कट्ट्यासह युवक अटकेत; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई.

जळगाव – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीनुसार केलेल्या धडक कारवाईत एरंडोल तालुक्यातील रवंजा बु! गावातील प्रविण कोळी (वय २२) याला गावठी कट्टा (पिस्टल) बाळगल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे.

CCTNS NO १६/२०२५

गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना माहिती मिळाली होती की, प्रविण कोळी हा दहशत माजविण्याच्या उद्देशाने गावठी पिस्तूल वापरत आहे. त्यानुसार, स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने रवंजा बु! येथे जाऊन खात्री केल्यानंतर आरोपीकडून अंदाजे २५,००० रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला.

या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात CCTNS NO १६/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

पुढील तपास सुरू असून, आरोपीला लवकरच न्यायालयात हजर केले जाणार आहे.



close