shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साईसेवा टीचर ट्रेनिंग सेंटर येथे मानसशास्त्रीय सेमिनार

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 सामाजिक बातमी
आधार शिक्षण व ग्रामिण विकास मंडळ संचलित, साईसेवा टीचर ट्रेनिंग सेंटर शिर्डी येथे Psychological Assessment & Report writing या विषयावर दिनांक २०फेब्रुवारी २०२५ ते २२ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसीय मानसशास्त्रीय तज्ज्ञांचे सेमिनार आयोजित करण्यात आले.

   या सेमिनारसाठी राज्यातील विशेष बौद्धिक अक्षम शाळेतील सर्व मानसशास्त्र तज्ञ उपस्थित होते. या सेमिनारमध्ये डॉ. अजित पाटील (परिस फाउंडेशन सांगली), डॉ. विशाल गाणार (डायरेक्ट भूमिका फाउंडेशन पनवेल), श्री संदीप शिंदे सर (बारामती), श्री किरण बोडके सर (पुणे), डॉ. ग्यानोजी दळवी (सिल्लोड), श्री तानाजी मिसाळ पाटील (इंदापूर) यांनी मार्गदर्शन केले.

    या कार्यक्रमाचे कॉर्डिनेटर मानसशास्त्र तज्ञ श्रीमती हेमलता पवार मॅडम यांनी केले. तसेच या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे सचिव श्री सुनील शिवनाथ कवडे सर व साईसेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी येथील मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा घुले मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
close