shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हिंदू नववर्षानिमित्त स्व-स्वरूप संप्रदाया तर्फे अहिल्यानगर शहर येथे भव्य स्वागत यात्रेचे आयोजन

जामखेड:
हिन्दु नववर्ष स्वागताच्या शोभा यात्रेनिमित दि.30मार्च 2025 वार रविवार रोजी सकाळी ठीक 7 वाजता नगर शहर येथे दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्यातील भक्तगणाने बहुसंखेने उपस्थित रहाण्याचे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संप्रदाय दक्षिण अहिल्यानगर जिल्हा सेवा समितीच्या वतीने आवाहन...
गेल्या अनेक वर्षाची परंपरा जोपासत नगर जिल्हयामध्ये चालु वर्षी हिन्दु नववर्ष निमित्त शोभा यात्रा वाजत गाजत ढोल  ताशांच्या गजरात व घोडे रथांच्या साथीने मोठ्या थाटामाटात संपन्न होणार असुन सदर मिरवणुक गुढी पाडव्या दिवशी नगर शहरातील LIC ऑफिस येथून या मिरवणुकीस प्रारंभ होणार असून शहरातील LIC बिल्डिंग - माळीवाडा बस स्टॅण्ड - माणिक चौक-कापड बाजार -चितळे रोड- चौपाटी कारंजा -दिल्ली गेट-दातरंगे मळा या मार्गे जाऊन शेवटी मार्कंडेय मंगल कार्यालयात साधारण 11 वाजेपर्यत या मिरवणुकीचे विसर्जन करण्यात येईल.. 


सदर मिरवणुकी दरम्यान ढोल ताशा  लवाजम्या सह वेगवेगळे आकर्षक असे देखावे सादर केले जाणार आहेत तसेच पालखी रथ असे आकर्षण असणार आहे तरी या सर्व उत्साही कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व भक्तगण, गुरुबंधू, गुरुभगिनी यांनी बहु संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
close