shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटांबना प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करुन कठोर कारवाई करावी

शिवसेना (उबाठा) कडून घटनेचा तिव्र निषेध
आरोपींवर कारवाईसाठी पोलिसांना निवेदन 

श्रीरामपूर / प्रतिनिधी: 
राहुरी येथे सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याची विटंबना करण्यात आली असून या घटनेचा निषेध करून यामध्ये दोषी असलेल्या आरोपींना अटक करून कडक कारवाई करावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख संजय छल्लारे,तालुकाप्रमुख लखन भगत,राधाकिसन बोरकर आदि शिवसैनिकांनी केले आहे.

यासंदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना श्रीरामपूर शहर व तालुका शिवसेनेच्यावतीने लेखी निवेदन देण्यात आले.
यावेळी शहरप्रमुख संजय 
 छल्लारे म्हणाले की, राहुरी येथे घडलेली घटना अत्यंत निंदनीय असून आम्ही त्याचा निषेध करीत आहोत.या घटनेचा सखोल तपास करून यामध्ये दोषी असलेल्या आरोपींना अटक करावी.राज्यात गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अपशब्द वापरून अवमान करण्याचा काही महाभाग प्रयत्न करीत आहेत.राहुरी येथील महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही घटना सामाजिक दृष्ट्या सर्वांसाठी अत्यंत घातक आहेत. राज्य शासनाने अशा घटना पुन्हा घडू नयेत,याकरिता कडक पाऊले उचलावीत. 
या संदर्भात अनेकांनी श्रीरामपूर बंद करावे अशी मागणी केली होती.परंतु श्रीरामपूर शहरातील छोटे, मोठे व्यापारी यांचे नाहक नुकसान होऊ नये याकरिता बंद ऐवजी या घटनेच्या संदर्भातील निवेदन देत असल्याचे श्री.छल्लारे यांनी यावेळी सांगितले. यावेळी लखन भगत, राधाकिसन बोरकर यांची भाषणे झाली. 
             याप्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवा तालुकाप्रमुख सुरेश थोरे, शहर प्रमुख सिद्धांत छल्लारे तसेच भगवान उपाध्ये,तेजस बोरावके,संजय साळवे, पत्रकार सुरेश कांगुणे, किशोर ढोकचौळे,संजय परदेशी,सुनील थोरात,रोहित नाईक,उत्तमराव कल्याणकर,शरद गवारे, विशाल पापडीवाल,संजय लाड,निलेश महाले,विशाल दुपाटी,प्रमोद गायकवाड, दत्ता करडे,बापू बुधेकर, अकिल पठाण,प्रमोद टाकसाळ, प्रकाश परदेशी, शंभू छल्लारे,सोनू त्रिभुवन, किशोर फुनगे,प्रदीप मोहिते, गणेश भगत,सोनू कोळसे, हबीब शेख,लक्ष्मण बर्डे, विशाल रहिले,गोपाल अहिरराव,गोपाल राजगुरू, नामदेव हळनोर, सोपान बोराडे,सदा मामा कराड यांच्यासह अनेक शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
close