shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विद्यानिकेतनमध्ये राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण संपन्न


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
येथील स्व.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शालांतर्गत भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनात इ.पहिली ते आठवीतील १५० विद्यार्थ्यांचा समावेश होता. विज्ञान विषयाच्या अध्ययन- अध्यापनाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना विज्ञानाची ओळख व्हावी.

           आधुनिकतेच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत विज्ञान पोहोचावे. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना व्हावी. विज्ञानाच्या मदतीने लागलेल्या नाविन्यपूर्ण शोधांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी.या अभ्यासपूरक हेतूने विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शन पाहण्यासाठी श्रीरामपूर शहर तसेच तालुक्यातील विद्यार्थी व पालक यांनी गर्दी केली होती.
          विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या उपकरणांपैकी वॉटर प्युरिफिकेशन,वॉटर रेन हार्वेस्टिंग, चांद्रयान, कार्बन अबसार्बर,ब्लाइंड पर्सन गाईड अलार्म, विंडमिल,अर्थक्वेक अलार्म, रेन डिटेक्टर, कॉलनीज ऑन मार्स,स्ट्रीट लाईट सेन्सर, प्लांट ऑर्गन,एटीएम मशीन,सेव वॉटर ही उपकरणे प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरले.
यावेळी उत्कृष्ट ठरलेले काही उपकरणे विद्यानिकेतन ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स ने भरविलेल्या तालुकास्तरीय भव्य विज्ञान प्रदर्शनासाठी पात्र ठरले. प्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
           विद्यार्थ्यांना कावेरी लोखंडे, विजेता व्यवहारे,योगिता गवारे, राजश्री व्हटकर, पुजा जगताप, सागर कोकणे यांचे मार्गदर्शन लाभले.
        यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून विद्यालयाचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके,व्हा.चेअरमन डॉ.प्रेरणाताई शिंदे, खजिनदार डॉ.राजीव शिंदे, प्राचार्य विनोद रोहमारे, समन्वयक मंगेश साळुंके, मनिषा उंडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.विधी क्षीरसागर, चि.विराज रावताळे यांनी केले.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर 9561174111
close