पुणे :- पुणे येथील हॉटेल मॅनेजमेंट हॉल, शिवाजीनगर येथे जागतिक महिला दिन निमित्त वडार समाज मोफत वधू वर परिचय मेळावा आणि नारी सन्मान सोहळा होणार अंतर संघटनेने रविवार दिनांक 23 मार्च 2025 रोजी सकाळी 11.30 वा. आयोजित केला होता.
कार्यक्रम सुरुवातीस लोकशाहीर मा. श्री. घनश्याम जाधव, पुणे व सहकारी यांनी वडार गीत गायन करून तसेच कु. हर्षाली कुरळपकर, कोल्हापूर जिल्हास्तरीय दांडपट्टा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती व भालाफेक यामध्ये सिल्वर मेडल विजेती हिने दांडपट्टा फिरवणे व लाठी फिरवणे सादरीकरण केले.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मा. कर्नल श्री. ऋषिकेश धोत्रे, लातूर यांचे शुभहस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. मनोहरजी मुधोळकर, अध्यक्ष - वडार ज्ञाती संस्था, सोलापूर मा. श्री. रमेश शिंदे उद्योजक - पुणे मा. श्री. दशरथ जाधव सर संचालक - रुक्मिणी वधू वर सूचक मंडळ, ऐरोली, मुंबई मा. विठ्ठल मोरे, पिंपरी, पुणे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. संदीप शिंदे, चिंचवड , पुणे इ. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. दयानंद इरकल, प्रदेश अध्यक्ष - वडार पँथर संघटना, यांनी भूषविले.
मा. प्रिया पवार - दळवी, मुंबई यांनी वडार समाज जीवन या विषयावर नुकतेच पीएचडी संपादन केलेले आहे. त्यांचा समाज गौरव पुरस्कार मा. कर्नल श्री. ऋषिकेश धोत्रे यांचे शुभहस्ते देऊन सन्मान करण्यात आला. तसेच मा. दिव्या रमेश गुंजाळ एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन महसूल अधिकारी निवड झाल्याबद्दल महिला क्रांतिवीर प्रितीलता वड्डार - प्रेरणा कन्यारत्न पुरस्कार
मा. कु. सलोनी शिंदे, पुणे उच्चशिक्षित अभियंता आणि इलेक्शन कमिशन नोडल ऑफिसर निवड झाल्याबद्दल
महिला क्रांतिवीर प्रितीलता वड्डार-प्रेरणा कन्यारत्न पुरस्कार मा. श्रीमती अविका राजू नाईक, कोल्हापूर यांनी गारर्मेट व्यवसाय उभारणी करून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिले बद्दल यशस्वी उद्योजिका म्हणून महिला क्रांतिवीर प्रितीलता वड्डार - प्रेरणा कन्यारत्न पुरस्कार, सुवर्णा शिंदे संगमनेर, सीमए परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल महिला क्रांतिवीर प्रितीलता वड्डार - प्रेरणा कन्यारत्न पुरस्कार तसेच कु. हर्षाली कुरळपकर, कोल्हापूर हिने जिल्हा स्तरावरील दांडपट्टा फिरवणे स्पर्धेत गोल्ड मेडल विजेती आणि भाला फेक मध्ये सिल्वर मेडल विजेती ठरली म्हणून महिला क्रांतिवीर प्रितीलता वड्डार - प्रेरणा कन्यारत्न पुरस्कार उपस्थित मान्यवर शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.
मोफत वधु वर मेळाव्यासाठी 75 वधू 73 वर असे एकूण 148 वधू वरांनी सहभाग घेऊन आपली माहिती दिली.
या कार्यक्रमास समाजातील अनेक मान्यवर पालक इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजाला करिअर मार्गदर्शन यूपीएससी व एमपीएससी मार्गदर्शन वधू वर सूचक केंद्र आर्थिक सहाय्य इ. बाबत एक समाजाची स्वतंत्र वेबसाईट निर्मिती करावी, अशी संकल्पना मांडली, यावर संयोजकांनी सकारात्मक विचार करण्यात येईल, असे सांगितले.
सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्र संचालन - मा. श्री. सुरज मोरे सर, इंदापूर आणि मा. श्री. दिपेश दादा पिटेकर, शेवगाव, अ.नगर यांनी केले. आणि संयोजन - श्री. हरिष बंडीवडार अध्यक्ष - अखिल वडार समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पुणे आणि अशोक पवार, एडमिन - टेलिग्राम ग्रुप, वड्डाल वधू वर सूचक मंडळ, पुणे यांनी केले होते.