संजय माकणे -( प्रतिनिधी)
लातूर जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विभागामार्फत दिला जाणारा 2023- 2024 चा आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार चाकूर तालुक्यातील हाळी (खुर्द) येथील अंगणवाडी सेविका श्रीमती सुनिता जालिंदर राडकर यांना देण्यात आला. याप्रसंगी राहुल कुमार मीना ( मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर ),
जावेद शेख ( उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास ),
तसेच सीडीपीओ लोमटे मॅडम, विस्तार अधिकारी कलशेटे मॅडम, पर्यवेक्षिका श्रीमती सेलूकर मॅडम तसेच सर्व परिवेक्षिका यांच्या उपस्थितीत आज दिनांक 28/ मार्च/2025 रोजी कार्यक्रम संपन्न झाला.