सेनगांव/विश्वनाथ देशमुख
हिंगोली जिल्ह्यात सेनगांव तालुक्यातील आजेगांव येथे दि.२१ मार्च शुक्रवार रोजी भल्या पहाटे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजणक घटना घडली असुन मयताचे लग्न दि.२३ मार्चरविवार रोजी असल्याची माहीती समजते.
सदरचा हा अपघात आज दि.२१ मार्च शुक्रवार रोजी सकाळी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.सदर मयत व्यक्तीचे नाव गणेश तनपुरे रा.कापडशिंगी ता.सेनगांव जि.हिंगोली वय वर्ष २५ असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.तसेच मयताचे आज देवकार्य व दि.२३ मार्च रविवार रोजी लग्न असल्याची माहीती आहे.अज्ञात वाहनाने दुचाकीला समोरुन जोरदार धडक दिलेल्या दुचाकीस्वारासह दुचाकी अक्षरश: शंभर फुटापर्यंत फरफरट नेली. धडकेत या दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन सदर घटनेची माहिती मिळताच गोरेगांव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक झळके,जमादार अनिल भारती यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असून मयत गणेश तनपुरे यांचा मृत्युदेह गोरेगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला असुन पुढील तपास गोरेगांव करीत आहोत.सदर वाहन वाळुचे टिप्पर असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे सदर टिपर मधील वाळु काही अंतरावर रस्त्यालगत टाकुन देत टिप्पर चालकाने पळ काढल्याचे सुत्राने सांगितले यावरुन पोलीसांनी आता आजेगाव येथील टि पाँईंट वरील दुकानाचे सीसीटिव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.