shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांव येथील तोष्णीवाल महाविद्यालयास करिअर कट्टा मार्फत विविध पुरस्कार

सेनगांव/विश्वनाथ देशमुख 

हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव येथील तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास दि.१९ मार्च बुधवार रोजी महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र तंत्रज्ञान सहाय्यक केंद्र यांच्या वतीने करिअर कट्टा या संकल्पनेतुन विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 



या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री डी.पी.सावंत तर उद्घाटक म्हणून मा.कुलगुरू डॉ.मनोहर चासकर हे होते.प्रमुख उपस्थितीत डॉ.किरण कुमार बोंदर,डॉ.डी.डी.पवार,प्राचार्य डॉ.पंजाब चव्हाण,प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव,प्राचार्य डॉ. खटाळ आदी मान्यवर मंडळी होती.उत्कृष्ट जिल्हास्तरीय महाविद्यालय म्हणून प्राचार्य डॉ. एस.जी.तळणीकर यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले,तसेच उत्कृष्ट जिल्हास्तरीय तालुका समन्वयक म्हणून डॉ.धनाजी पाटील (मत्स्य शास्त्र विभाग प्रमुख),उत्कृष्ट जिल्हास्तरीय महाविद्यालयीन समन्वयक डॉ.अरविंद नाईक (दुग्धशास्त्र विभाग प्रमुख),यांना सन्मानित करण्यात आले.

close