सेनगांव/विश्वनाथ देशमुख
सेनगांव तालुक्यातील आजेगांव येथे दि.२१ मार्च शुक्रवार रोजी सकाळी ५ च्या सुमारास एका टिप्परने दुचाकी चालवणाऱ्या भावी नवरदेवास पाठीमागुन जोराची धडक देऊन टिप्पर चालकाने पळ काढला यात भावी नवरदेवाचा मृत्यु झाल्याची दुर्दवी घटना घडली असुन पळ काढणाऱ्या टिप्पर चालकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हिंगोली येथे टिप्परसह ताब्यात घेतले असुन गोरेगांव पोलीसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती पोलीस सुत्राने दिली आहे.
सेनगांव तालुक्यातील आजेगांव येथे दि.२१ मार्च शुक्रवार रोजी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वाळु वाहतुक करणाऱ्या टिप्परने कापडशिंगी येथील २५ वर्षीय युवक गणेश तनपुरे यांच्या दुचाकीला पाठीमागुन जोराची धडक दिली यामध्ये तनपुरे यांना अक्षरश: शंभर फुटापर्यंत फरफरट नेले.गणेश तनपुरे यांचा आज देवकार्याचा कार्यक्रम होता व दि.२४ मार्च सोमवार रोजी लग्न होणार होते.परंतु गणेश तनपुरे हे आज सकाळी दुचाकीवर वाघजाळी येथे नातेवाईकास आणन्यासाठी गेले होते मात्र त्यांच्यावर काळाने घाला घातला.धडक दिल्यानंतर टिप्पर चालकाने घटनास्थळाहुन पळ काढला हि माहीती स्थानिक गावकऱ्यांनी गोरेगांव पोलीसांना कळविल्याने तात्काळ गोरेगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद झळके,पोलीस उपनिरीक्षक निलेश लेनगुळे,जमादार अनिल भारती यांच्या पथकाने घटनास्थळी भेट घेत मयत गणेश तनपुरे यांचा मृत्युदेह गोरेगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला.
टिप्पर चालकास अटक करण्याच्या मागणीसाठी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हिंगोली जिल्हाप्रमुख संदेश देशमुख,क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे,नामदेव पतंगे,शिवसेनेचे सेनगांव तालुका संघटक प्रविण महाजन यांच्यासह नातेवाईकांनी गोरेगांव पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन सुरु केल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील,गुन्हेशाखेचे निरीक्षक विकास पाटील गोरेगांवात दाखल झाले.याप्रकरणी टिप्पर चालकाच्या अटकेसाठी गुन्हे शाखेचे उप निरीक्षक कपील आगलावे,जमादार विकी कुंदनानी,महादु शिंदे,गणेश लेकुळे यांच्या पथकाने आज दुपारी टिप्पर चालक अभिजीत सरकटे यास हिंगोली येथे टिप्परसह ताब्यात घेतले आहे.टिप्पर चालकास गोरेगांव पोलीसांच्या ताब्यात दिले जाणार असल्याची माहीती पोलीस सुत्राने दिली आहे.