shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रोटरी व इनरव्हील क्लब आणी आरटीओ कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान संपन्न

नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करावे - उपप्रादेशिक परिवहन अधिकारी - अनंता जोशी 

 श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर येथील रोटरी क्लब ऑफ श्रीरामपूर तसेच इनरव्हिल क्लब आणी उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालय श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिक आणी वाहन चालक यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सालाबादाप्रमाणे रोटरी क्लब ऑफ श्रीरामपूर यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असतात यावेळी शहरानजीक तालुक्यातील हरेगांव फाटा पोलीस निवारा कक्ष या ठिकाणी उपक्रम राबविण्यात आले. प्रसंगी बोलताना उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी म्हणाले की, अपघाताचे प्रमाण वाढले असुन वेगमर्यांदा यावर लक्ष केंद्रीत करणे,  वाहनधारकांना हेल्मेट परिधान करण्याविषयी  तसेच नागरिक व वाहनधारक यांनी शासकीय नियमाचे पालन करावे, 

मद्य प्राशन करून कुठलेही वाहन चालवू नये अशी माहिती दिली. यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे  यांनी रोटरी क्लब तसेच इनरव्हील क्लब यांच्या उपक्रमाबद्दल कौतुक करत शुभेच्छा व्यक्त केल्या.

 सदर कार्यक्रमाप्रसंगी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक रोहित पवार, सागर पुंड, श्रीराम भांबारे, राणी सोनवणे, सागर ननावरे, तसेच डॉ.अजित घोगरे, सेक्रेटरी उद्धव तांबोळी, अध्यक्ष भाग्येश कोठावळे, खजिनदार विनोद पाटणी, माजी अध्यक्ष उल्हास धुमाळ, इनरव्हील क्लब ऑफ श्रीरामपूर अध्यक्ष डॉ. सौ.शितल घोगरे,माजी अध्यक्षा सौ. सुनीता धुमाळ, उपाध्यक्ष शितल भुतडा, डॉ. फरगडे, शिवसेना तालुका उपप्रमुख संतोष डहाळे, यासोबतच मोठ्या संख्येने नागरिक वाहनधारक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

संयोजन समितीच्या तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांचे शुभ हस्ते वाहनधारकांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन उद्धव तांबोळी यांनी केले तर आभार भाग्येश कोठावळे यांनी मानले.

वृत्त विशेष सहयोग
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव 
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर -  9561174111
close