सेनगांव/विश्वनाथ देशमुख
सेनगांव तालुक्यातील वरुड चक्रपान येथे दि.२१ मार्च शुक्रवार रोजी ॲग्रीस्टिक व आयुष्यमान भारत कॅम्पचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयामध्ये करण्यात आले होते.या कार्यक्रमाला गावातील नागरीकांनी ॲग्रीस्टिक व आयुष्यमान भारत कार्ड काढले असून या कार्यक्रमाला उपस्थित वरुड चक्रपान मंडळ अधिकारी, तलाठी मॅडम पोधाडे, ग्रामपंचायत ग्राम अधिकारी अरुण वाबळे यांच्यासह गावातील नागरीक मोठ्या संख्येत उपस्थित होते.यावेळी शेतकऱ्यांना तलाठी मॅडम पोधाडे यांनी योग्य मार्गदर्शन केले तसेच यावेळी ॲग्रीस्टीक व आयुष्यमान भारतचे कार्ड वाटप करण्यात आले यावेळी कांतराव कोटकर, काशीरामजी कोटकर,किसन घोडेकर,पमु घोडेकर आदीसह महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.