देवळाली प्रवरा:-
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पदी आंतरराष्ट्रिय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांची व श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघ क्षेत्र प्रमुख पदी चंद्रकांत कराळे यांची तसेच देवळाली प्रवरा शहर प्रमुख पदी प्रकाश वाकळे आणि राहुरी फॅक्टरी शहर प्रमुख पदी शरद खांदे यांची निवड झाल्याबद्दल राहुरी फॅक्टरी येथील साई सेवा पतसंस्थेचे वतीने शाल श्रीफळ देऊन अभिनंदन केले.
प्रसंगी.. साईसेवा पतसंस्थेचे चेअरमन प्रदीप येवले, व्हा. चेअरमन विलास मुसमाडे, छत्रपति रावसाहेब मुसमाडे, प्रहार चे माजी शहर उप अध्यक्ष गणेश भालके, राहुरी कारखान्याचे बंगाळ साहेब आदि मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.