देवळाली प्रवरा:-
प्रहार जनशक्ती पक्षाचे देवळाली प्रवरा शहर प्रमुख पदी प्रकाश वाकळे व राहुरी फॅक्टरी शहर प्रमुख पदी शरद खांदे यांची निवड करण्यात आली असून श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघ क्षेत्र प्रमुख चंद्रकात कराळे यांचे हस्ते निवडीचे प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
प्रसंगी प्रहार चे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस, देवळाली प्रवराचे माजी शहर उप प्रमूख गणेश भालके आदि उपस्थित होते.