युवा क्रांती प्रतिष्ठानचे 14 वे वर्धापन दिनीं युवा क्रांती प्रतिष्ठान, लोढा परिवार, जैन संघटनेचा उपक्रम : राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची कार्यक्रमाला उपस्थिती
इंदापूर : इंदापूर येथे निराधार व विधवा महिलांना साडी चोळी वाटप, अनाथ मतिमंद मुलांना कपडे, शालेय विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, नर्सिंगच्या गरजू विद्यार्थिनींना ड्रेस मटेरियल, सफाई कर्मचारी महिलांना साडी वाटप व अंगणवाडी विद्यार्थ्यांना तसेच इतर ठिकाणी चतुर्थ श्रेणी कामगार महिला व पुरुषांना युवा क्रांती प्रतिष्ठान, लोढा परिवार व जैन संघटनेच्या वतीने कपडे वाटप करून, सुग्रास स्नेहभोजन देवून अनोख्या पद्धतीने माणुसकीचा स्नेह मेळावा पार पडला.
इंदापूर शहरातील शहा सांस्कृतिक भवन येथे रविवार ( दि. 23 मार्च 2025 ) रोजी राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्धाटन करण्यात आले. तर कर्मयोगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरतशेठ शहा शहा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, गंगापूर जैन संघटनेचे अध्यक्ष सतीश बाफना, इंदोरचे मनीषा पवन जैन उपस्थित होते.
तसेच वृक्ष संजीवनी परिवार, मायमाऊली युवा क्रांती, जयहिंद माजी सैनिक संघटना, पतंजली योग समिती, इंदापूर व्यापारी संघटना, रोटरी क्लब ऑफ इंदापूर, इंदापूर नगरपालिका कर्मचारी
पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत शिताप यांनी केले. तर सूत्रसंचलन संतोष नरुटे यांनी केले.
तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये संजय सोनवणे,वैभव लोढा, नरेंद्र गांधी, शिवाजीराव मखरे, संदिपान कडवळे, रज्जाकभाई पठाण, विवेक लोढा, विपूल लोढा, अरविंद वाघ, मयुराताई पाटील, निलोफर पठाण , रेश्मा शेख, राजश्री मखरे, रवि पवार, मारुती मारकड, मोरेश्वर कोकरे, अनिल पवार, द्यानदेव डोंगरे, सिमाताई कल्याणकर, सचिन बोगावत, हर्षल भटेवरा, दिपेश लोढा, विरेश छाजेड, सुनिल भटेवरा, चंद्रभान लोढा, सुनिल लोढा, , अक्षय खरात, प्रशांत उंबरे, राहुल गुंडेकर, सागर पवार, प्रा. धनंजय देशमुख, उमेश राऊत,जव्हारलाल बोरा, हुकमचंद बोरा,
प्रमोद भंडारी, सुनिता अवघडे, गणेश टुले, बाळूमामा धाडीवाल इत्यादी उपस्थित होते.
तर धरमचंद लोढा,महेंद्र गुंदेचा, सचिन चौगुले,, सागर शिंदे, सायरा आतार, वर्षाताई मखरे यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
----------------------------------
: विविध पुरस्कार आणि सन्मान सोहळा
यावेळी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यामध्ये आदर्श माता-पिता पुरस्कार श्री व सौ सुरेखा मोतीलाल लोढा पुणे, समाजरत्न पुरस्कार खुशबू मोहीत जैन, इंदोर, समाजभूषण पुरस्कार पवन जैन, इंदोर, समाजभूषण सतीश बाफना गंगापूर, अनाथांचा नाथ पुरस्कार कल्पेश पोरवाल पुणे, समाजभूषण सौ. रक्षा दिनेश बेदमूथ्था मनमाड, अन्नदाते पुरस्कार वैभव लोढा, पुणे, अन्नदाते पुरस्कार दिनेश मेहता पुणे, इंदापूर भूषण पुरस्कार सौ वैशाली भरतशेठ शहा यांना देण्यात आला. तसेच जयवंत नायकुडे जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेज इंदापूर निराधाराचा पोशिंदा, अभयजी प्रकाशजी अनुपजी संचेती परिवाराचे पुणे, दशरथ महाराज देशमुख महाडिक, आधुनिक श्रावण बाळ गोविंद वृद्धाश्रम टेंभुर्णी, अख्तर भाई मोमीन दस्तगीर मंडप सर्विस इंदापूर, योगीराज सतिश बोत्रे उद्योजक, मेजर जयसिंग जगन्नाथ धनवे बलव महाराज, विशाल लोढा सेवाभावी सामाजिक कार्यकर्ते, लक्ष्मण निंबोकर शेगांव सेवाभावी सामाजिक कार्यकर्ते यांना सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.