प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:-
जिल्हा नियोजन अंतर्गत बीड जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार केला जातो व वेगवेगळ्या विभागाला निधी वितरित केला जातो,त्यामध्ये खासदार, आमदार,जी.प. सदस्य व जिल्हा नियोजन चे सदस्य यांनी प्रास्ताविक केलेल्या कामांना निधी वितरीत केला जातो. परंतु ही प्रथा महाविकास आघाडी काळात मोडली गेली त्या वेळी तत्कालीन खा.प्रीतमताई मुंडे,आमदार लक्ष्मण पवार, आ .नमिता मुंडदा यांना 1 रु निधी दिला नाही .त्या वेळी आपण जिल्हा नियोजन चे सदस्य होतात त्या वेळी आपण या लोकांनी प्रस्तावित केलेल्या कामांना निधी द्या अशी शिफारस का नाही केली उलट आपण आनंद साजरा करत होतात .आता आपण बीड जिल्ह्यचे खासदार आहेत असे संसदेच्या सभागृहात सांगत आहात. पण आपण विरोधी पक्षात आहेत हे विसरलात. कारण विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधी ना जिल्हा नियोजन चा निधी देऊ नये असा नियम आपल्याच सत्तेच्या कार्यकाळात झाला होता .
त्यामुळं जे पेरलं जात तेच उगवत हा निसर्गाचा नियम आहे पण मला एक गोष्ट अभिमानानं व गर्वाने सांगावी वाटते व ती तुम्हाला पण मान्य करावी लागेल ती गोष्ट म्हणजे लोकनेत्या ना.पंकजाताई मुंडे ज्या वेळी या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या त्या वेळी त्यांनी तुमच्या सहित जिल्ह्या नियोजन च्या सभागृहातील सर्व सदस्यांना निधी दिला होता. हे मी पुराव्यानिशी बोलतोय .त्यावेळी ना.पंकजाताई मुंडे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी भेदभाव केला नव्हता की ,हे लोकप्रतिनिधी विरोधी पक्षचा आहे यांना निधी द्यायचा नको आस नाही केलं तर उलट त्या वेळी तुमच्यासारख्या जी.प. सदस्यांना पण आमदार एवढा निधी दिला होता की नाही याचं पण उत्तर आपण बीड जिल्यातील जनतेला द्यावं अशी माझी विनंती आहे. कारण त्यांना पण कळणं गरजेचं आहे की निधी वाटपात भेदभाव करण्याची प्रथा कोणी सुरू केली .त्यामुळे आपण आता सभागृहात बोलणं चुकीच वाटत तरी आपण मागणी केली किंवा न केली तरी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार हे नक्कीच आपण प्रस्तावित केलेल्या कामावर निधी नाही दिला तरी इतर लोकप्रिनिधींनी प्रास्तविक केलेल्या कामांना निधी नक्की देतील व बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करतील याची खात्री आहे.
असे मार्केट कमिटी केजचे उपसभापती डॉ वासुदेव नेहरकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हटले आहे.