अहिल्यानगर!
महाराष्ट्रामध्ये शिक्षण व्यवस्थेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिक्षणाची माहेरघर म्हणून पुणे ओळखले जाते. देशातून आणि परदेशातून पुणे येथे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात असे असताना बदलत्या जीवनशैलीनुसार शिक्षण देखील बदलली आजच्या काळात डमी शाळा निर्माण झाली गुरूंचा दाख विद्यार्थ्यांना असायला हवा अनेक समाजामध्ये अधिकारी वर्ग आजही सांगतात माझ्या गुरूमुळे मी घडलो शासनाने अनेक शाळा निर्माण केल्या शिस्त लावली विद्यार्थी सामाजिक जीवनामध्ये यशस्वी झाली तसेच व्यक्तिगत आयुष्यात देखील यशस्वी झाली परंतु अलीकडच्या काळामध्ये डमी शाळा नावाची भूत विद्यार्थ्यांच्या मानगुटीवर बसले आहे.
अनेकांना माहिती नसेल तर मी शाळा म्हणजे काय? डमी शाळा म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायचा परंतु शाळेत जायचे नाही हे विशेषतः कोठे घडते तर विनाअनुदानित मान्यताप्राप्त अकरावी बारावी सायन्स ला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पालक क्लासेसचा पर्याय निवडतात या क्लासच्या माध्यमातून त्यांना हवे असलेल्या परीक्षेचे शिक्षण त्या ठिकाणी दिले जाते विद्यार्थी शाळेत जात नाही हजेरी मात्र दाखवली जाते यामध्ये शिक्षण विभाग मॅनेज असतो की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. डमी शाळेमध्ये विद्यार्थी न येता फक्त शाळेमध्ये नाव घातले जाते प्रत्यक्षात सर्व पैसा स्टाफ बोगस उभा केला जातो ज्या शाळेमध्ये विद्यार्थी नाही त्या शाळेतील शिक्षक नेमकी कोणाला शिकवत असतील ते खरोखर शिक्षक आहेत का? हा फार संशोधनाचा भाग आहे या बाबतीमध्ये शिक्षण विभाग तेरी भी चूप मेरी चुप अशा पद्धतीने वागत आहे. महाराष्ट्राचे शिक्षण धोरण बदलत असल्याचा दावा सरकार करत असले तरी प्रत्यक्षात शिक्षणाचा बट्ट्याबोळ करत असल्याचे चित्र आहे. क्लासच्या लाखोच्या फी शहरात राहणे पालकांच्या अपेक्षा त्यामध्ये अपयश आल्यास विद्यार्थी आत्महत्या परिसरात होणाऱ्या मारामाऱ्या या सर्व गोष्टीसाठी डमी शाळा कारणीभूत आहेत. सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर शिक्षण नेऊन घरोघरी शिक्षण पोहोचविल्याचा आव आणणारे शासन विद्यार्थ्याचे त्यातल्या त्यात गरीब विद्यार्थी चे शिक्षण कायमची बंद करीत आहे याची जबाबदारी शासन घेणार का? डमीशाळा अहिल्या नगर जिल्ह्यातील इत्यंभूत माहिती काढलेली असून थोड्याच दिवसांमध्ये या संदर्भात लेखमाला सुरू केली जाणार आहे तोपर्यंत एवढेच डमी शिक्षण विद्यार्थ्याचे नुकसान..!