रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश्वर विद्यालयाचे माजी विद्यार्थी तब्बल 45 वर्षांनी आले एकत्र.
इंदापूर : तब्बल 45 वर्षांनी रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश्वर विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा दि.12 मे 2025 रोजी शेटफळगढे येथील श्री हॉटेल मध्ये खूप ऊत्साहात पार पडला.
1980 सालच्या दहावीच्या बॅचमधील विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र आल्यानंतर एकमेकांकडे पाहून भारावून गेले. लहानपणीच्या निस्वार्थ आठवणींना उजाळा देणारा क्षण खरंच आयुष्यातील प्रत्येक आनंद पेक्षा मोठा क्षण वाटत होता.
मित्रा मित्रांचे मन मोकळे करणारा हा क्षण प्रत्येक वर्षी यावा अशी मनोमन इच्छा यावेळी प्रत्येकाला भेटताना वाटत होती.
50 वर्षे उलटून गेली होती तरी सुद्धा जुन्या आठवणींना उजाळा देऊन सर्वांनीच आपली मनोगत एका कौटुंबिक स्नेहाने विस्तृतपणे दिलखुलास मांडली. या बॅचला शिकवणारे श्री मेरवे सर यांना शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते किती घट्ट आणि प्रेमळ आहे हे आजच्या उस्फुर्त प्रतिसाद पाहून भरून आले. हे क्षण न विसरता येण्यासारखे आहेत,असेच सर्व माजी विद्यार्थ्यांनी वर्षातून एकदा असा मेळावा उत्साहात आयोजित करून नवीन पिढीला प्रेरणा द्यावी आणि एक वेगळा आदर्श निर्माण करावा जेणेकरून एक सामाजिक सलोखा निर्माण होईल.
या मेळावा पार पाडण्यासाठी दिलीप सुर्वे, राजेंद्र सवाणे तसेच अशोक धुमाळ यांनी खूप परिश्रम घेतले .