श्रीरामपूर / प्रतिनिधी:
इकरा एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या गोविंदपुरा अ.नगर येथील पी. ए. इनामदार इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थ्यांनी यावर्षीही यशाची परंपरा कायम ठेवली शाळेतील ११४ विधार्थांनी दहावीची परीक्षा दिली त्यापैकी ११२ विधार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. व दहावी बोर्डाच्या मार्च २०२५ च्या परीक्षेत शाळेचा निकाल ९८ टक्के लागला. यामध्ये शाळेचे विद्यार्थी शेख यासीन अंन्सार याने ९२.६० टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवला. तर द्वितीय शेख मदीहा समशेर ९१.४०, तृतीय शेख मोहंमद अफ्फान अंन्सार ८८.६० टक्के गुण प्राप्त केले.
या यशाबद्दल कॉलेजचे प्राचार्य फिरोसअली मराक्कटील, उप प्राचार्या फरहाना शेख तसेच संस्थेचे चेअरमन अब्दुल रहीम खोकर, व्हा.चेअरमन इंजि. इकबाल सय्यद, सचिव विकार काझी, खजिनदार डॉ. खालीद शेख, अकॅडमीक डायरेक्टर शब्बीर मोहंमद सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान- अ.नगर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111