shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धरती माता महिला गटाचा तालुक्यात डंका!

धरती माता महिला गटाचा तालुक्यात डंका!

 माता महिला शेतकरी गटाचे यशस्वी झेंडे!‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२४’ मध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक.

पिंपळे खुर्द:- पाणी फाउंडेशनच्या ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२४’ या प्रतिष्ठित स्पर्धेत पिंपळे खुर्द येथील धरती माता महिला शेतकरी गटाने तालुका पातळीवर आपली मेहनत, समर्पण आणि उत्कृष्ट कार्याच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशासाठी त्यांना ५०,००० रुपयांची रोख पारितोषिक रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या प्रेरणादायी यशाबद्दल मा. जिल्हा परिषद सदस्या सौ. जयश्रीताई अनिल पाटील यांनी गटातील सर्व महिला शेतकऱ्यांचे विशेष अभिनंदन करत त्यांच्या कार्याची मनःपूर्वक स्तुती केली. त्यांनी नमूद केले की, "शेतकरी महिलांचा सन्मान म्हणजेच ग्रामीण भारताच्या कणा असलेल्या कृषी संस्कृतीचा खरा गौरव आहे."

धरती माता महिला शेतकरी गटाने दाखवलेली जिद्द, एकजूट आणि शाश्वत शेतीविषयक कार्य ही इतरांसाठीही नक्कीच प्रेरणादायी बाब आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!





close