shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हरेगांव येथे बुद्ध पोर्णिमा उत्साहात साजरी

          
 वडाळा महादेव   ( प्रतिनिधी ) श्रीरामपुर तालुक्यातील हरेगांव येथे बुद्ध विहार ट्रष्ट यांच्या वतीने बुद्ध पौर्णिमा निमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते 
 यावेळी  श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब शिंदे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करुन मानवंदना देण्यात आली व प्रतिमा पुजन करण्यात आले.

          बुद्ध विहार ट्रष्ट चे सचिव सी एस.खरात यांनी बौद्ध पोर्णिमेचे महत्व सांगुन सर्वांना शुभेच्छा दिल्या  बौद्धाचार्य राहुल वाघ यांनी त्रिसरण ,पंचशिल , बुद्ध वंदना घेतली . ग्रा .पं .सदस्य सुनिल शिणगारे यांनी धम्मदेसना देत सर्वांना शुभेच्छा दिल्या  यावेळी आरोग्य मित्र भीमराज बागुल , बौद्धाचार्य दिपक नवगिरे , रवि गायकवाड , एकनाथ थोरात , संदिप धनेधर  मिलिंद मोरे , भैय्यासाहेब थोरात , कशिनाथ जगताप  सौरव सुर्यवंशी  सोनल वाघ  राणी मोरे  कोमल थोरात  संस्कृती नवगिरे  निशा वाघ आदि उपासक उपासिका ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते. खिर दान करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
close