shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रयत शिक्षण संस्थेच्या कदम विद्यालयात ऋषिकेश पारवे प्रथम*

*रयत शिक्षण संस्थेच्या कदम विद्यालयात  ऋषिकेश पारवे प्रथम*
इंदापूर :इंदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय मधील ऋषिकेश रमेश पारवे 91.80 टक्के गुण मिळवून प्रथम आला. कू.आरती प्रदीप बागल या विद्यार्थिनीने 90.40 % गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला. तर कु.प्राची दत्तात्रय भिसे हिने 82.80 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.यावर्षी विद्यालयातील 89 विद्यार्थ्यांनी दहावी बोर्ड परीक्षा दिली.त्यापैकी 82  विद्यार्थी उत्तीर्ण झाले.13 विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण तर ते 27 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा शेकडा निकाल 92.13 % लागला.सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे  विद्यालयाचे प्राचार्य संजयकुमार शिंगारे,पर्यवेक्षिका सौ. पुष्पा काळे, शाळा समिती सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, माता-पालक संघ, सर्व पालक व शिक्षक यांनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना पुष्पा काळे,वैशाली बेंडसुरे, होनाजी गवळी, धनसिंग भोसले, बाबासाहेब साळुंके,कल्पना टकले, वर्षा नागणे, सुषमा अंदुरे, सपना भंडारी, ज्ञानेश्वर वलेकर, यांनी मार्गदर्शन केले.
close