न्यू इंग्लिश स्कूल गुंडेगाव शाळेच्या २००५ च्या बॅचचे गेट-टुगेदर उत्साहात संपन्न......
वाळकी / प्रतिनिधी : दादासाहेब आगळे
न्यू इंग्लिश स्कूल गुंडेगाव, ता. जि.अहिल्यानगर शाळेमध्ये इयत्ता दहावीच्या २००५ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे गेट-टुगेदर दिनांक १६ मे २०२५ रोजी सकाळी १०ते ४ या वेळेत संपन्न झाले. सदर गेट-टुगेदरसाठी तब्बल २० वर्षांनी इयत्ता दहावीच्या २००५ च्या बॅचचे विद्यार्थी- विद्यार्थिनी व त्यांना त्यावेळी मार्गदर्शन करणारे शिक्षक एकत्र जमलेले होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यू इंग्लिश स्कूल गुंडेगाव शाळेचे माजी मुख्याध्यापक व्ही.एस.भोसले सर हे होते तर उद्घाटन विद्यमान मुख्याध्यापक उत्तम निकम सर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे माजी विद्यार्थी व देवळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन हराळ व श्री.सतीश जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी आपला परिचय करून दिला.यावेळी माजी विद्यार्थिनींनी शिक्षकांचे औक्षण केले. त्यानंतर ट्रॉफी, शाल. गुलाबपुष्प देऊन शिक्षकांचा स्वागत सत्कार करण्यात आला. दिवंगत शिक्षक व विद्यार्थी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बऱ्याच विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या शालेय आठवणींना पुन्हा उजाळा दिला. त्याचबरोबर उपस्थित गुरुवर्यां विषयी कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी उपस्थित शिक्षकांनी मनोगत व्यक्त करताना माजी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. श्रीमती नेहुल मॅडम व उत्तम निकम सर यांनी मनोगत व्यक्त करताना २००५ च्या बॅचने शाळेला केलेल्या एक लाख रुपयांच्या मदतीबद्दल कौतुक केले. तर श्रीमती समिंदर मॅडम यांनी तुमची बॅच ही एक यशस्वी बॅच असल्याचे सांगितले. विलासदादा कोतकर यांनी मनोगत व्यक्त करताना सर्व माजी विद्यार्थी- विद्यार्थिनी यांचे गेट-टुगेदरच्या आयोजनाबद्दल कौतुक केले.अध्यक्षीय भाषणात भोसले सर यांनी आपल्या विनोदी शैलीत सर्वांना भरभरून हसवले व जीवनाच्या प्रवासात शालेय जीवन हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. गेट टुगेदरच्या निमित्ताने पुन्हा एक दिवसाची शाळा भरली. सर्वजण वीस वर्षानंतर भेटत असल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. गेट-टुगेदर साठी ७३ माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी व २१ शिक्षक उपस्थित होते. यावेळी सर्वांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती. कार्यक्रमाच्या शेवटी श्री.सतीश जाधव यांनी उपस्थित माजी विद्यार्थी - विद्यार्थिनी व शिक्षक यांचे आभार मानले. या गेट-टुगेदर साठी २००५ च्या दहावीच्या बॅचला अध्यापन करणारे भोसले सर,काळे सर,पिंपळे सर. श्रीमती नेहुल मॅडम. श्री. डी. एन. हराळ, श्री. एम. एम. शिंदे सर, श्रीमती वाघ मॅडम,वाघ सर,पाडळकर सर, पेटकर सर, श्रीमती समिंदर मॅडम,एस. के. कारले सर,सोपान भापकर, विलास कोतकर, बाळासाहेब साबळे, लोखंडे मामा त्याचबरोबर शाळेचे सध्याचे मुख्याध्यापक यू.बी.निकम सर उपस्थित होते. गेट-टुगेदरच्या नियोजन करून यशस्वीतेसाठी सतीश जाधव,सागर भापकर,नितीन हराळ,प्रमोद ढोरजकर,राहुल दिवटे,शकील सय्यद,सचिन येठेकर,सागर निकम, अनिल दळवी,उमेश माने,अरुण धावडे, रोहिणी भापकर,स्वाती आगळे,वर्षा हराळ,मीनाक्षी गिरवले,जयश्री कुताळ यांनी प्रयत्न केले. न्यू इंग्लिश स्कूल गुंडेगाव शाळेच्या २००५ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे गेट-टुगेदर उत्साहात, आनंदात व भावनिक वातावरणात संपन्न झाले.
गेट-टुगेदर चा निमित्ताने तयार झालेल्या विद्यार्थी- विद्यार्थ्यांचा ग्रुप हा कायमस्वरूपी टिकवला पाहिजे व त्याच्या माध्यमातून अडीअडचणी संकटात एकमेकांना मदत केली पाहिजे. कुटुंबात देखील आपण आई-वडिलांसोबत राहिलो पाहिजे.
व्हि.एस. भोसले
मा.मुख्याध्यापक न्यु इंग्लिश स्कूल,गुंडेगाव.
सध्याच्या धावपळीच्या व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये 20 वर्षानंतर सर्वजण एकत्र भेटणं व शालेय जीवनात रममान होणे खऱ्या अर्थाने अविस्मरणीय व आनंददायी घटना आहे. असे गेट-टुगेदर पुन्हा पुन्हा होणे गरजेचे आहे..
प्रमोद ढोरजकर
मा.विद्यार्थी व मुख्याधिकारी देवळा नगरपरिषद