*इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेमध्ये विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभाचे जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये आयोजन*
इंदापूर : जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचालित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी मध्ये दिनांक 16 मे 2025 रोजी इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या इंदापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पार पडला. त्यासाठी इंदापूर तालुक्यातील 63 शाळांन मधील गुणवंत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला . प्रत्येक विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक आलेल्या एकूण 189 विद्यार्थ्यांचा, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
विद्येची आराध्य देवता सरस्वती पूजनाने व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संस्थेतील कु.ज्ञानेश्वरी नाथाजी मोहिते व कु.मृण्मयी अतुल शिंदे दोन विद्यार्थिनींनी तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला तसेच कु.ज्ञानेश्वरी नाथाजी मोहिते हिने गणित या विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला, त्याबद्दल संस्थेच्या वतीने तिचे व इंदापूर तालुक्यातील यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक करण्यात आले. व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
संस्थेचे विश्वस्त पृथ्वीराज ढोले यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, संस्थेमध्ये तुम्हाला शहरापेक्षा जास्त सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील तसेच जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर मोबाईलच्या आहारी न जाता आपले ध्येय साध्य करावे. मैदानी खेळ खेळावे पण मोबाईल सारख्या व्यसनापासून दूर राहावे असा मोलाचा सल्ला दिला, जिद्द चिकाटीच्या जोरावर यश संपादन करता येते. तसेच
संस्थेचे संस्थापक ,अध्यक्ष श्रीमंत ढोले यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना तुम्ही रत्नाची खान आहात *यशस्वी भव! असे शुभ आशीर्वाद दिले.
प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले ध्येय ठरवावे व त्यानुसार योग्य तो मार्ग निवडावा. आपल्या परिसराचे नाव उज्वल करावे व देशाची व समाजाची सेवा करावी असे सांगितले तसेच संस्थेत गुणवंत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, जसे स्कॉलरशिप याविषयीचे मार्गदर्शन केले.
इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की गुणगौरव समारंभ हा अभिमानाचा व कौतुकाचा, आनंदाचा क्षण आहे.
दहावी व बारावी मध्ये यश संपादन करणे एवढे सोपे नाही ,आणि त्यापेक्षाही तालुक्यात येणे सोपे नाही, स्पर्धेत टिकायचे असेल तर मानसिकता व गुणवत्ता महत्त्वाची आहे. प्रत्येकाने आपला दृष्टिकोन बदलायला हवा तरच आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो असे अनमोल मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांच्या उपस्थित पालकांनी ही आपले मनोगत व्यक्त केले व त्यांनी आपल्या पाल्याच्या मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे व मार्गदर्शक शिक्षकांचे आभार मानले,
गुणगौरव समारंभ कार्यक्रमासाठी इंदापूर तालुक्याचे इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी
सचिन खुडे, जय भवानीगड विकास प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष. श्रीमंत ढोले, उपाध्यक्ष
सौ. चित्रलेखा ढोले ,
सचिव हर्षवर्धन खाडे, सहसचिव सौ.पौर्णिमा खाडे, विश्वस्त. पृथ्वीराज ढोले, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य
गणेश पवार,
प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य. राजेंद्र सरगर, विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य.सम्राट खेडकर, यशस्वी विद्यार्थी, पालक,मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते.