श्रीरामपुर [ प्रतिनिधी
श्रीरामपूर येथील राष्ट्रीय श्रीराम संघ व शिवसेना पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ऑपरेशन शिंदुर दरम्यान शहीद जवानांच्या स्मरणात श्रीरामपूर शहरातून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भारतीय संरक्षण दलातील शहीद जवान यांच्या कुटुंबियांसाठी एक लाख रुपयाचा धनादेश शासनाकडे सुपूर्त करण्यात आला.
प्रसंगी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख राष्ट्रीय श्रीराम संघ प्रमुख सागर भाऊ बेग शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख सौ सविताताई वाडीले युवा नेते रवींद्र जाधव मा श्री दत्तात्रेय खेमनर श्री आकाश भाऊ बेग सागर शेटे सुनील शेळके अशोक तुपे समीर माळवे प्रकाश मेहत्रे गणेश करमासे सनी थोरात प्रसाद दळवी राजेश वाव्हळ विशाल जाधव सुनील पाचोणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाबद्दल श्रीरामपूर शहरातील अनेक मान्यवरांनी संयोजक समिती यांचे कौतुक केले उपस्थित सर्वांचे श्री रवींद्र जाधव यांनी आभार मानले.