*इंदापूर* ( दि.१४) :- माजी नगराध्यक्ष व मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरे यांच्या चतुर्थ स्मृतीदिना निमित्त बुधवारी (दि.१४) भिमाई आश्रमशाळेत त्यांना अभिवादन करण्यात आले.
शकुंतला रत्नाकर मखरे, संतोष मखरे, ॲड. समीर मखरे व कुटुंबीयांसह दिवंगत रत्नाकर तात्या मखरे यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
बौद्धाचार्य बाळासाहेब सरवदे यांनी त्रिशरण,पंचशील हे मखरे कुटुंबीयांसह म्हटले.
विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिवंगत रत्नाकर तात्या मखरे यांचा पुतळा व प्रतिमेस पुष्प,पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.
माऊली नाचण, हनुमंत कांबळे, दयानंद चंदनशिवे,अमोल उन्हाळे, तय्यबभाई ,बाळासाहेब सरवदे यांनी दिवंगत रत्नाकर तात्या मखरे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
गोपीचंद गलांडे, विलास शिंदे, अविनाश कोतमिरे,प्रा. शिंदे सर, शाहीदभाई शेख, गोरख तिकोटे, संजय कांबळे, रवी चव्हाण,अश्वजीत कांबळे, संतोष शेंडे, सुनील मिसाळ, भोसले गुरुजी, युवराज दणाणे, तेजस मखरे, अवधूत पाटील, नितीन चंदनशिवे, सचिन बेसरे, पत्रकार सिद्धार्थ मखरे तसेच महिला भगिनी, संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले. आभार साहेबराव पवार यांनी मानले.