shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गुढीपुढे काढा सुबक रांगोळी डिझाइन...! नववर्षाचे स्वागत करा रंगीबेरंगी रांगोळ्यांनी...!

       गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. हा सण चैत्र महिन्याच्या पहिल्या तिथीला येतो आणि वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल देतो. या दिवशी घराघरांत गुढी उभारली जाते, नवीन कपडे घातले जातात आणि मंगलमय वातावरणात नववर्षाचे स्वागत केले जाते. या सणाला रांगोळी काढण्याची प्रथा खूप जुनी आहे. रांगोळी ही केवळ सजावटीचे साधन नाही, तर ती समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानली जाते. प्रत्येक मराठी घरात दारासमोर काढलेली सुंदर रांगोळी पाहायला मिळते.
या दिवशी घराघरांत गुढी उभारली जाते, नवीन कपडे घातले जातात आणि मंगलमय वातावरणात नववर्षाचे स्वागत केले जाते. या सणाला रांगोळी काढण्याची प्रथा खूप जुनी आहे.  
 
                     रांगोळी ही केवळ सजावटीचे साधन नाही, तर ती समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानली जाते. प्रत्येक मराठी घरात दारासमोर काढलेली सुंदर रांगोळी पाहायला मिळते. यंदा पाडव्याला दारात किंवा गुढी भोवती काढता येतील.विविध रंगांचा वापर करुन आपण ही गुढीची रंगोळी काढू शकतो. अगदी सोप्या पद्धतीनेही ही रांगोळी काढता येऊ शकते..घराबाहेर थोडी मोठी जागा असेल तर अशी थोडी मोठी रांगोळी काढता येऊ शकते. यामध्ये गडद रंग वापरल्यास ही रांगोळी जास्त उठून दिसते.
    ‌‌.     जर तुम्हाला रांगोळीचे विविध प्रकार काढता येत असतील तर आपण अशा प्रकारची सुंदर आखीव - रेखीव भरीव अशी रांगोळी काढून छान सजावट करू शकतो. 
जर तुम्हाला रांगोळीचे विविध प्रकार काढता येत असतील तर आपण अशा प्रकारची सुंदर आखीव - रेखीव भरीव अशी रांगोळी काढून छान सजावट करू शकतो.पाडव्याच्या सणाला फुलं, आंब्याची पानं, कडूनिंबाची पानं यांना विशेष महत्त्व असतं. रांगोळीत आपण या सगळ्याचा समावेश केल्यास संस्कृती आणि परंपरेचे दर्शन या रांगोळीतून दिसून येते.
जर तुम्हाला रांगोळी काढता येत नसेल तर तुम्ही आधी खडूने जमिनीवर हवे तसे चित्र किंवा रांगोळी रेखाटून घ्या त्यानंतर त्यावर पांढऱ्या रांगोळीने बॉर्डर भरून मग आता मनपसंत रंग भरा.गुढी भोवती दिव्यांनी आणि रांगोळीने सजावट केल्यास अधिक चांगला लूक येईल.शुभ गुढीपाडवा असा संदेश रांगोळीवर लिहून देखील तुम्ही ही रांगोळी अधिक आकर्षक करता येईल.
               गुढी, नथ अशा पारंपरिक वस्तू रांगोळी मध्ये रेखाटून तुम्ही तुमची रांगोळी अधिक सुंदर आणि आकर्षक करू शकता.तुम्ही एकाच रांगोळीत अनेक रंगांची उधळण करून देखील अशी विविध रंगी रांगोळी काढू शकता. तुम्ही एकाच रांगोळीत अनेक रंगांची उधळण करून देखील अशी विविध रंगी रांगोळी काढू शकता.जर तुम्हाला अगदी झटपट गुढी पाडव्याची रांगोळी काढायची असेल आणि वेळ कमी असेल तर तुम्ही अशा प्रकारची रांगोळी काढू शकता. यासाठी आवडत्या रंगाची बॅकग्राउंड तयार करून तुम्ही त्यावर अशी एक काठी, कापड आणि तांब्या ठेवून गुढी रांगोळीत देखील गुढी उभारु शकता.
                 तुम्हाला अगदी झटपट गुढी पाडव्याची रांगोळी काढायची असेल आणि वेळ कमी असेल तर तुम्ही अशा प्रकारची रांगोळी काढू शकता. यासाठी आवडत्या रंगाची बॅकग्राउंड तयार करून तुम्ही त्यावर अशी एक काठी, कापड आणि तांब्या ठेवून गुढी रांगोळीत देखील गुढी उभारु शकता.

माधुरी पैठणकर
रांगोळी आर्टिस्ट
पाथर्डी,
मो. +919623728300
close