""मंजुरी प्राप्त घरकुलांची बांधकामे तात्काळ सुरू करावेत. - गटविकास अधिकारी पंचायत समिती इंदापूर सचिन खुडे.
इंदापूर : इंदापूर विकास गटामध्ये सन 2024 25 या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन मध्ये एकूण 5806 घरकुलांचे उद्दिष्ट पैकी 5642 घरकुले मंजुरी आहेत .
मंजुरी मिळालेले व आधार लिंक बँक लिंकेज व्हेरिफाय असलेले लाभार्थी 3969 यांना पहिला हप्ता 15000 रुपये अनुदान लाभार्थीच्या बँक खात्यात जमा झालेले आहे.
ज्या लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता जमा झाला आहे ,त्यांनी घरकुलाचे पाया बांधकाम त्वरित सुरू करावीत, म्हणजे त्यांना घरकुलाचा दुसरा हप्ता वितरण करणे सोयीस्कर होईल, असे आवाहन पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री सचिन खुडे यांनी केले आहे.
तसेच जागा नसलेले 998 लाभार्थ्यांनी पंडित दीनदयाळ जागा खरेदी अर्थसहाय योजनेमधून स्वतःची ५०० sq ft जागा उपलब्ध खरेदी केलेस त्यांना एक लाख रुपये मर्यादेपर्यंत अनुदान मिळू शकते, तसे प्रस्ताव ग्रामपंचायतकडे जमा करणे आवश्यक आहे.
शासन राजपत्र 2023 तुकडे बंदी सुधारणा निर्णय नुसार तुकडे बंदीचा एक गुंठा जागा खरेदीसाठीचा प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी यांचे मान्यतेसाठी ग्रामपंचायत मार्फत प्रस्ताव सादर करावेत असे श्री संजीव मारकड विस्तार अधिकारी इंदापूर यांनी सांगितले आहे .
तसेच
गायरान वनविभाग इरिगेशन गावठाण सरकारी शेती महामंडळ इत्यादी जागेत राहत असतील त्यांनी ग्रामपंचायतकडे तात्काळ संपर्क साधून ग्रामपंचायत मार्फत नमुन्यात जागा मागणी प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करावे असेही आवाहन श्री सचिन खुडे यांनी केलेले आहे .
--------------------------------
चौकट-
""स्वतःची जागा नाही ,पण रक्तातील नातेवाईकांची जागा उपलब्ध असल्यास त्वरित संमतीपत्र ग्रामपंचायतकडे जमा करावीत ,म्हणजे त्यांचे नमुना 8 उतारे या कार्यालयास सादर होतींल ,त्यांना पुढील हप्ते वितरण करणे सोयीचे होईल असेही श्री सचिन भगवांन खुडे यांनी सांगितले. ""