shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एल.जी बनसुडे विद्यालयात सुरक्षा कवच हेल्मेट वाटप.

एल.जी बनसुडे विद्यालयात सुरक्षा कवच हेल्मेट वाटप.
इंदापूर : पळसदेव (ता- इंदापूर) येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी. बनसुडे विद्यालयामध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिनाच्या महासप्तहाचे औचित्य साधून पालक व विद्यार्थी सुरक्षेसाठी संस्थेच्या व सेवा सहयोग फाउंडेशन च्या वतीने 200 हेल्मेट वाटप करण्यात आले. सामान्य लोकांमध्ये विशेषता नवीन वयोगटातील विद्यार्थी व पालकांमध्ये  सुरक्षितता जागृत करण्यासाठी सामाजिक जागृती झाली पाहिजे या उद्देशाने हा उपक्रम सेवा सहयोग फाउंडेशन पुणे व ब्राईट लाईफ सामाजिक संस्था पळसदेव  यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला आहे .  *राईट टू सेफ्टी प्रकल्प* - *२०२५' या* प्रकल्पांतर्गत विद्यार्थी व पालकांनी वाहन चालवताना सुरक्षा नियमांचे पालन करत हेल्मेट वापरले तर आपल्या आयुष्य खूप चांगले व सुरक्षित राहू शकते असे मार्गदर्शन वरिष्ठ प्रकल्प समन्वयक रोहित झगडे यांनी केले. डाळज आरटीओ पोलीस बी . आर.शिंदे साहेब यांनी आपल्या मनोगतातून वाहतुकी च्या नियमांचे व कायद्याचे पालन करणे का गरजेचे आहे हे स्पष्ट केले.  
यावेळी सेवा सहयोग चे कार्यवाहक क्षितिज ढोके, रावी सुरूशे, अनिल गरड तसेच ब्राईट लाईफ सामाजिक संस्था पळसदेव चे अध्यक्ष सोमनाथ माने सचिव सुहास माने , सिद्धनाथ माने, जालिंदर गरड ,  आरटीओ पोलीस बी. व्ही जगदाळे, एस.एस हिरवे , एन.ए.जगताप ए.जी. वागजकर, टी .एल .लोंढे, एस.डी अर्जुन , एल.जी बनसुडे संस्थेचे अध्यक्ष हनुमंत नाना बनसुडे,बचत गट अध्यक्षा शहाभाभी, सचिव नितीन बनसुडे,प्राचार्या वंदना बनसुडे,मुख्याध्यापक राहुल वायसे, समन्वयक सुवर्णा वाघमोडे ,विभाग प्रमुख ज्योती मारकड, तेजस्विनी तनपुरे, सीमा बाराते, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आदींची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश दरदरे तर आभार प्रदर्शन प्रवीण मदने यांनी केले. सुरक्षा ही काळाची गरज आहे या उद्देशातून पालक वर्गाला हेल्मेट चे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.
close