shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांव तालुक्यातील माझोड येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द

धान्य वाटपात दिरंगाई करणे भोवले.

जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अचानक भेटीने बिंग फुटले..


सेनगांव/विश्वनाथ देशमुख 

हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील माझोड येथे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दि‌.२८ मार्च शुक्रवार रोजी दिलेल्या अचानक भेटीत स्वस्त धान्य वाटपाचे बिंग फुटले असून महिलांनी मांडलेल्या तक्रारीनंतर स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात आला आहे.याबाबतचे आदेश जिल्हा पुरवठा विभागाने रात्री उशिरा काढले आहे.

            


हिंगोली जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानदाराकडून वेळेवर धान्य वाटप होत नसल्याच्या तक्रारी जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त होत आहेत याशिवाय काही दुकानदाराकडून कमी प्रमाणात धान्य वाटप केले जात असल्याचा आरोप केला जात आहे‌यासंदर्भात जिल्हाधिकारी गोयल यांनी दुकानाची तपासणी करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार जिल्हाधिकारी अभिनव गोयल ,प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील,निरीक्षण अधिकारी विशाल लोहाटे,महसूल सहाय्यक पी.व्ही कालबांडे,ग्राम महसूल अधिकारी एन.जी.ढोले उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांनी माझोड येथील स्वस्त धान्य दुकानाला भेट दिली यावेळी दुकानासमोर काही महिला लाभार्थी होत्या त्यांनी या लाभार्थ्यांशी संवाद साधला असता दुकानदाराकडून एक महिना आड करून धान्य दिले जाते तसेच वेळेत धान्य दिले जात नसल्याच्या तक्रारी या महिलांनी केल्या तसेच धान्य वाटपाचे कामही कमी असल्याचे दिसून आले.यावरून दुकानदाराचा परवाना रद्द करण्याचे आदेश त्यांनी पुरवठा विभागाला दिले तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्यात सुद्धा अशाच प्रकारे स्वस्त धान्य दुकानदारावर अचानक भेटी देऊन कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी सर्व तहसीलदारांना दिल्या आहेत त्यानंतर प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील यांनी स्वस्त धान्य दुकानदार निळोबा मुळे यांचा स्वस्त धान्य विक्रीचा परवाना रद्द केला आहे याबाबतचे आदेशही दि.२८ मार्च शुक्रवार रोजी रात्री काढण्यात आले आहेत

close