प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:-
केज येथील खुरेशी मोहल्ल्यातील अजहर मस्तान खुरेशी हे सोमवारी दि.१४ एप्रिल रोजी सायंकाळी पाच ते साडे पाच वाजण्याच्या दरम्यान आपल्या चिकनच्या दुकानातून ग्राहकाला चिकन पोंहचविण्या साठी जाताना चुलत भाऊ रेहान शाहेद खुरेशी यास चिकनच्या दुकानात बसवून तो पर्यंत तु दुकान सांभाळ असे सांगून गिऱ्हाईकाला चिकन देण्यासाठी दुकानाच्या समोरील रस्त्यावरून गेला.
याच वेळी शेजारच्या चिकनच्या दुकानातील रेहानचा अल्पवयीन मित्र साकीय ईसाक खुरेशी वय १७ वर्षे याने रेहान सोबत गोंधळ घालून,रेहानचे शर्ट ओढून त्याला दुकानाच्या बाहेर आणले व धक्काबुकी करुन रेहानच्या छातीवर व डोक्यावर मारहाण करून सिंमेटच्या नवीन च झालेल्या नालीवर त्याला उचलून जोरात आदळले.त्यामुळे रेहान च्या डोक्याला व छातीला जबर मार लागल्याने तो बेहोश झाला होता.त्यानंतर त्याला केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेवुन गेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करुन त्याला मयत घोषित केले.त्या नंतर रात्री उशिरा दर्गा परिसरात त्याच्या पार्थिवावर दफनविधी करण्यात आला.मयत रेहानचा चुलत भाऊ अजहर मस्तान खुरेशी याच्या फिर्यादी वरून बुधवारी दि.१६ एप्रिल रोजी रात्री ७-००वाजता केज खुरेशी मोहल्ल्या तील अल्पवयीन मुलगा साकिब इसाक खुरेशी वय १७ वर्षे याच्या विरुद्ध केज पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे हे करीत आहेत