इंदापूरच्या क्रेडाई संस्थेच्या अध्यक्षपदी विधिज्ञ जालिंदर भसळे यांची निवड.
सेक्रेटरी म्हणून बाळासाहेब म्हेत्रे यांची तर खजिनदार म्हणून मुख्तार पठाण यांची निवड.
इंदापूर : बांधकाम क्षेत्रातील क्रेडाई इंदापूर या संस्थेची सर्वसाधारण सभा दि. 16 एप्रिल 2025 रोजी पार पडली असून यावेळी अध्यक्ष म्हणून दोन वर्षाकरिता (सण 2025 ते 2027 ) सर्वानुमते निवड
विधिज्ञ जालिंदर भसळे यांची करण्यात आली असून त्यांच्या समवेत क्रेडाई इंदापूरचे सेक्रेटरी म्हणून बाळासाहेब म्हेत्रे यांची तर खजिनदार म्हणून मुख्तार पठाण यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष सेक्रेटरी, खजिनदार व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन सर्वांच्या वतीने करण्यात आले.
याप्रसंगी क्रेडाई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव माळुंजकर, संस्थापक उपाध्यक्ष गोपीनाथ मोरे, ज्येष्ठ संचालक विशाल बोंद्रे ,ज्येष्ठ संचालक दयानंद व्यवहारे ,मावळते अध्यक्ष संजय भोंग, सेक्रेटरी बाळासाहेब मैत्री, खजिनदार सोमनाथ गवळी, माजी अध्यक्ष कैलास नरुटे, मुक्तार पठाण इत्यादी उपस्थित होते.