आधुनिक उपचारपद्धतीमुळे रोग निवारण मोठ्याप्रमाणात होत आहे - डॉ.अशपाक पटेल
नगर / प्रतिनिधी:
बदलती जीवनशैली आणि वातावरणातील बदलांमुळे मनुष्याची प्रतिकार शक्ती कमी होत आहे. विशेषत लहान मुलांमध्ये आजारांचे प्रमाण वाढतांना दिसत आहे. दुषित पाणी, फास्ट फूड, अस्वच्छता यामुळे आजारांची उत्पत्ती होतांना दिसते. या वेगवेगळ्या आजारांचे निदानही अत्याधुनिक मशिनरीद्वारे करता येत असल्याने उपचार करणेही आता सोपे होत आहे. उपचार वेळेत न झाल्याने आजार बळावतात. त्यासाठी अशा मोफत तपासणी शिबीराच्या माध्यमातून आजारांचे निदान वेळेत झाल्यास त्यावर उपचार करणे सोपे होणार आहे. त्यामुळे अशा शिबीरांची गरज आहे, असे प्रतिपादन डायबॅटोलाॅजिस्ट व कार्डीयोलाॅजिस्ट डॉ. अशपाक पटेल यांनी केले.
अल करम हॉस्पिटलच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले जयंती व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तीन दिवस मोफत सर्वरोग आरोग्य शिबीर निदान व उपचार करुन रुग्णांना औषधे ही देण्यात आली. या शिबीरात प्रत्येक दिवशी ४० ते ५० रुग्णांनी याचा लाभ घेतला. रुगणांची तपासणी डॉ. अशपाक पटेल यांनी केली. रक्त व शुगर तपासणी महेश सानप, शिफा शेख, विशाल काळे, दानिश खान, मुस्कान शेख यांनी केले. यावेळी डॉ. जहीर मुजावर, डॉ सय्यद खुसरो, डॉ के. व्यंकटेश, शेरअली शेख आदी उपस्थित होते.
प्रास्तविकात हॉस्पिटलचे डॉ. जहीर मुजावर म्हणाले, आज विविध आजारांची उत्पत्ती ही हवा, पाणी, खाण्यातून होतांना दिसते.धकाधकीचे जीवन, वेळेवर न जेवणे, दुषित अन्न-पाणी, कोड्रिंक, फास्टफूड यामुळे बर्याच जणांना पोटाचे विकार होतात. यासाठी नियमित व्यायाम, संतुलीत आहार महत्वाचा आहे. प्रत्येकाने आपली प्रतिकार शक्ती वाढविण्याची गरज आहे. तसेच छोट-छोट्या व्याधींकडे दुर्लक्ष न करता नियमित तपासणी केल्यास भविष्यात उदभवणारे आजारांवर वेळीच निदान होऊ शकते. यासाठीच मोफत तपासणी शिबीराच्या माध्यमातून रुग्णांना दिलसा देण्याचे काम अल करम हॉस्पिटलच्यावतीने करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.या शिबीरात हॉस्पिटलच्या नर्सिंग स्टाफ, टेक्निशियन, कर्मचारी यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेरअली शेख यांनी केले. तर आभार एजाज तांबोली यांनी मानले.
समता मिडिया सर्व्हीसेस, श्रीरामपूर