shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
             🌍
  • विशाल जेठे यांनी विकसित केलेले डिजिटल "बॅनर स्टुडिओ" ॲप म्हणजे एक क्रांतीचे पाऊल आहे...!
  • -->

    About Me

    किटकजन्य आजार व उन्हापासून बचाव...!

    किटकजन्य आजार व उन्हापासून बचाव
    मा डॉ प्रमोद पोतदार
    (वैद्यकीय अधीक्षक)
    उपजिल्हा रुग्णालय मोर्शी


              मार्च एप्रिल महिन्यापासून साधारणतः सर्वजण कुलर वापरतात परंतु कुलर वापरत असताना कुलरच्या पाण्याच्या ट्रेमध्ये डास होण्याची शक्यता असते त्यामुळे किटकजन्य आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो यामध्ये प्रामुख्याने हिवताप,डेंग्यू,चिकनगुनिया आजाराची लागण होण्याची शक्यता असते तरी सर्वांनी कुलरमधील पाणी 8 दिवसातून एकवेळेस बदलावे यामुळे किटकजन्य आजारापासून आपले व आपल्या कुटुंबियांचे रक्षण होईल.
                  उन्हाळ्यात थेट सूर्याच्या किरणाच्या संपर्कात येण टाळावे. तसेच नागरिकांनी उन्हात जास्त न फिरता आपल्या शरीराच तापमान कसे थंड राहणार याची काळजी घ्यावी. कडक उन्हाळयात बाहेर जाताना आवर्जून डोके झाकणे. त्यासोबतच गॉगल देखील लावावा यामुळे डोळ्यांना सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचाव होईल. उन्हाळ्याच्या दिवसात वातावरणातील उष्णता वाढते आणि त्याचा शरीरावर बदल होतो. 
                डिहायड्रेशन, उष्माघात, भूक मंदावणे, उन्हाळा लागणे, ऍसिडिटी, डोकं दुखणं, अस्वस्थ वाटणं, थकवा जाणवणं या समस्या उद्भवतात. आपापल्या प्रकृतीनुसार, तसंच आहार-विहारानुसार ही लक्षणं कमी-अधिक असू शकतात. मात्र या वातावरणाशी जुळवून घेणं थोडंसं कठीण होतं. आपलं शरीर या बदलांना जुळवून घेत शरीराच तापमान नियंत्रित राखण्याचा प्रयत्न करते. मेंदूतील हायपोथॅलिमस हा भाग हे तापमान नियंत्रित करतो. शरीरात पाण्याची कमतर जाणवू लागल्यास स्नायूंच्या प्रणालीद्वारे हा संदेश मेंदूला पोहोचवला जातो आणि तहान भागवण्याची क्रिया घडते.
                  हिवाळा आणि पावसाळयाप्रमाणेच उन्हाळ्यातही अनेक आजार पसरण्याची शक्यता असते. यात उष्माघात, जंतुसंसर्ग, डायरिया, कावीळ, टायफॉईड, गोवर, कांजण्या, गलगंड, डोळ्यांचे आजार, त्वचेचे आजार, मुतखडा, लघवी मार्गाचा जंतुसंसर्ग इत्यादी समस्यांचा समावेश आहे. सूर्याच्या प्रखर उष्णतेपासून शरीराचं रक्षण करण्यासाठी कैरीचं पन्हं, लिंबू सरबत, जिऱ्याचं सरबत, शहाळ्याचं पाणी, फळांचा ताजा रस, दूध घालून केलेली तांदूळाची खीर, गुलकंद इत्यादी थंड पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.  
             दिवसातुन कमीत कमी 5 ते 6 ग्लास पाणी अवश्य प्या. उन्हाच्या दिवसात आपल्या शरीरातील पाणी घामाच्या रूपात बाहेर पडतं, म्हणुन शरीरात पाण्याची कमतरता पडल्यास तब्येतीवर परीणाम होऊ शकतो, म्हणुन उन्हाळयाच्या दिवसांत पाणी भरपुर प्रमाणात प्यावं. तुम्ही ट्रेवलिंग वाटर फिल्टर देखील वापरू शकता. बऱ्याच जणांना 5 ते 6 ग्लास पाणी रोज लागतं आणि जास्त देखील लागु शकतं उन्हाळयाच्या दिवसांत व्यायाम करतांना घाम आल्यास जास्त तहान देखील लागु शकते.
                   उन्हाळात अधिक जेवण जात नाही. त्यामुळे आहार हलका असावा. उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होते, यासाठी नोकरदार वर्गाने आपला जेवणाचा डबा खराब झाला नाही ना, याची पहिल्यांदा खात्री करुन त्यानंतर अन्नाचे सेवन करावे. त्याचबरोबर गरम, तिखट तसेच जड अन्नपदार्थ खाणे टाळावेत. कारण उन्हाळ्याच्या दिवसात वातावरणातील आणि शरीरातील तापमान अधिक वाढते. या दरम्यान फळ व फळभाज्यांचा वापर अधिक प्रमाणात करावा. द्राक्ष, अननस, गाजर व काकडी खावी यामुळे शरीराला पाणी अधिक मिळते. जेवणामध्ये गरम मसाले, लाल पावडर व मिरची मसाला जास्त प्रमाणात वापरणे शक्यतो टाळावे. तसेच तेलकट, तिखट व बाहेरील जंक फूड खाण टाळावं. जेवणात शक्यतो वरण-भात, दही, ताक सॅलड असे पदार्थ असल्यास आरोग्यास उत्तम. त्याचबरोबर जेवणाच्या आधी फळे खाणे शरीरास उत्तम असते. वरील प्रमाणे काळजी घेतल्यास उन्हाचा त्रास आपणास होणार नाही.....
    close