वडाळा महादेव [ प्रतिनिधी ] श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील भाविकांचे श्रद्धास्थान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी सालाबादाप्रमाणे १८ व्या वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे रविवार दिनांक २० - ०४ - २०२५ रोजी या सप्ताहास प्रारंभ होत असून शुक्रवार दिनांक २५ रोजी कार्यक्रमाची सांगता होणार आहे योगीराज गंगागिरीजी महाराज ब्रह्मलिन महंत नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने गुरुवर्य भास्करगिरी महाराज महंत रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आचार्य विद्यावाचस्पती ह भ प डॉ शुभम महाराज कांडेकर यांच्या अधिपत्याखाली तसेच ह भ प सुदाम महाराज चौधरी यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये पहाटे काकडा आरती व सात ते बारा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तसेच सायंकाळी सात ते आठ हरिपाठ व संत तुकाराम महाराज चरित्र कथा संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी ह भ प गोरक्षनाथ महाराज अकोलकर साहेबराव महाराज हांडे बाळासाहेब महाराज पवार सुधाकर महाराज लोंढे किसन तात्या गायधने माऊली कृपा मित्र मंडळ गायधने वस्ती महिला मंडळ वीरभद्र महिला व पुरुष भजनी मंडळ तसेच दैनंदिन अमृतपान सेवा श्री शिवाजी गायधने सर परिवाराकडून व सप्ताह कालावधीमध्ये सायंकाळी अन्नदान सेवा राजेंद्र काळे बाळासाहेब काळे अशोक गायधने अंबादास मगर अशोक थोरात श्रीकांत थोरे अक्षय मगर गोरक्षनाथ भोसले हंसराज भोसले राजेंद्र भोसले रमेश भोसले संजय भोसले मेजर सुमनताई भोसले रामचंद्र गायधने भाऊसाहेब गायधने डॉ श्री पवन भांड पुंडलिक भांड निवृत्ती भांड अण्णासाहेब भोसले सोमनाथ शेठ महाले दिलीप महाले गणेश राशिनकर दादासाहेब भोसले नानासाहेब भोसले शिवाजी भोसले प्रमोद भोसले रावसाहेब भोसले आदी भाविक भक्त अन्नदान सेवा यासाठी प्रयत्नशील आहेत
शुक्रवार दिनांक २५ रोजी सायंकाळी सात ते नऊ ह भ प विश्वनाथ गिरीजी महाराज घोगरगाव यांचे काल्याचे किर्तन संपन्न होणार आहे तरी पंचक्रोशीतील भाविक भक्त यांनी कार्यक्रमाचा महाप्रसादाचा दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन किरण पाटील गायधने श्री फक्कडराव गायधने सर निपाणी वडगाव ' वळदगाव शिरसगाव भोसले वस्ती उंबरगाव कारेगाव भजनी मंडळ तसेच वळदगाव स्टोन क्रेशर मालक सप्लायर्स मराठा विकास प्रतिष्ठान सह्याद्री फाउंडेशन मुंजाबा मित्र मंडळ एकलव्य संघटना विविध क्षेत्रातील मान्यवर आदी भाविक भक्त या कार्यक्रमासाठी प्रयत्नशील आहेत