shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हिवताप पतसंस्थेचे अध्यक्षपदी श्रीमती मंजुषा देशपांडे,उपाध्यक्ष गजेंद्र तराळ, सचिव प्रकाश दातीर तर कोषाध्यक्ष पदी शिल्पा शिर्के यांची बिनविरोध निवड..!


स्वास्थ सेवा हिवताप सेवकांची सहकारी पतसंस्था र. न. १४६ ची २०२५-३० या पंचवार्षिक कालावधी करिता  श्री एस. एस. पाटील निवडूक प्राधिकारी यांचे अधिपत्याखाली लोकशाही मार्गाने घेण्यात आली. यामध्ये अध्यक्ष पदावर श्रीमती मंजुषा देशपांडे,उपाध्यक्ष श्री गजेंद्र तराळ, सचिव श्री प्रकाश दातार तर कोषाध्यक्ष पदावर शिल्पा शिर्के यांची बिनविरोध निवड झाली.

संचालकामधे   सर्वश्री सुरेंद्र वाडीकर , रामेश्वर नागपूरकर ,बबन खंडारे , किशोर बकाले ,भाष्कर होरे,विजय साळुंखे व संदीप लांडे यांची बिनविरोध निवड झाली.   मागील कार्यकारिणीचे अध्यक्ष श्री डी. एस. पवार उपाध्यक्ष पी.यु.गिरी, सचिव पी. ओ. लुंगे, एस.व्ही.जयस्वाल, निवडणूक अधिकारी श्री एस. एस. पाटील यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारी मंडळाचे पुष्पगुच्छ देवुन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  निवडून आलेल्या नवीन पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले. श्री डी. एस. पवार यांनी संस्थेचे कार्याविषयी विस्तृत माहिती दिली. श्री पी. यु. गिरी यांनीही मनोगत व्यक्त केले. संस्थेचे सचिव श्री पी. ओ. लुंगे यांनी उत्कृष्ट संचालन केले. 

याप्रसंगी श्री आर. जी. खोलापूर  व ईतर संस्थेचे सभासद उपस्थित होते. चहा पाननंतर सभेची सांगता झाली. नवनिर्वाचित संचालक मंडळाचे उज्वल भविष्यासाठी सर्वांनी  शुभेच्छा दिल्या. 
close