shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विशाल जेठे यांनी विकसित केलेले डिजिटल "बॅनर स्टुडिओ" ॲप म्हणजे एक क्रांतीचे पाऊल आहे...!


विशाल जेठे यांनी विकसित केलेल्या डिजिटल बॅनर्स स्टुडिओ आणि मोबाईल ॲप्स हिंदू धर्म रक्षक बिट्टू भाऊ लष्करे यांच्या शुभहस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रिबीन कट करून उद्घाटन संपन्न...!

अहिल्यानगर प्रतिनिधी:-
आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगात डिजिटल माध्यमांचा वापर करून सामान्य जनतेपर्यंत सेवा पोहोचवण्याचे कार्य अनेक युवा उद्योजक करत आहेत. अशातच अहिल्या नगर जिल्ह्यातील देहरे गावातील युवा डेव्हलपर विशाल जेठे या युवकाने एक अत्यंत उपयुक्त आणि बहुउद्देशीय मोबाईल ॲप तयार केले आहे आणि आजच्या डिजिटल युगात प्रत्येक व्यवसाय, कार्यक्रम, संस्था किंवा वैयक्तिक ओळख सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध केली जाते. अशावेळी आकर्षक बॅनर, पोस्टर, लोगो आणि विविध ग्राफिक्स डिझाईन यांची मोठी गरज भासते आणि हिच गरज ओळखून 'बॅनर स्टुडिओ' हे एक बहुउद्देशीय आणि उपयुक्त मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहे. जी कोणत्याही व्यक्तीला सहज सोप्या पद्धतीने बॅनर डिझाईन करण्याची संधी उपलब्ध करून देते. बॅनर स्टुडिओ ही ॲप विशाल जेठे यांनी स्थानिक पातळीवर निर्माण केली असून ग्रामीण भागातील युवकांना डिजिटल माध्यमांशी जोडण्याचा हा एक प्रेरणादायी प्रयत्न आहे. 




      बॅनर स्टुडिओ  हे फक्त एक ॲप नसून ती युवकांच्या आत्मनिर्भरतेचे आणि डिजिटलतेच्या  दिशेने टाकलेले एक प्रेरणादायी पाऊलच म्हणावे लागेल या ॲपच्या माध्यमातून बॅनर डिझाईन डिजिटल निमंत्रण पत्रिका सोशल मीडिया पोस्ट पब्लिसिटी मटेरियल फोटो एडिटिंग अशा अनेक सेवा अत्यंत अल्प दरात एकाच ठिकाणी मिळणार आहेत. त्यामुळे डिझायनर व्यावसायिक मोठ्या उद्योग धंद्यांमधील लोक तसेच राजकीय सामाजिक कार्यकर्ते यांना आपले प्रचार व प्रसार अगदी सहजतेने करता येणार आहे या ॲपमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वापरकर्त्यांसाठी सहज आणि सोप्या इंटरफेस तयार केला आहे. त्यामुळे काही मिनिटातच आपल्या फोटो व लोगो सह आकर्षक बॅनर तयार करून इतरांना पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये टेम्पलेट्स, फाॅन्टस यांचा समावेश असून सतत नवनव्या डिझाइन्स अपडेट केल्या जातात तेही वेळ आणि पैसे दोन्हींची ही बचत करून बॅनर पोस्टर सोशल मीडिया डिझाइन्स आता एकाच ठिकाणी बॅनर स्टुडिओ हे ॲप गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध असून याला अनेक सकारात्मक प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. बॅनर स्टुडिओ ॲपचा फायदा सर्वांनी घ्यावा.सदर लिंक  https://youtube.com/shorts/3ixRTgEmjSg?si=eJXAIXexuQN1R1K3 याप्रमाणे आहे.
      दरम्यान बॅनर स्टुडिओ हे विशाल जेठे या युवकाने स्थानिक पातळीवर निर्माण केले असून ग्रामीण भागातील युवकांना डिजिटल माध्यमांशी जोडण्याचा  नक्कीच हा एक प्रेरणादायी उपक्रम म्हणावा लागेल.

या बॅनर स्टुडिओ ॲपच्या उद्घाटनाप्रसंगी आलेल्या पाहुण्यांना पारंपारिक पद्धतीने फेटे बांधून  जेठे परिवाराच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी मोठी फटाक्यांची आतीश बाजी ही करण्यात आली. 
        यावेळी प्रमुख पाहुणे हिंदू धर्मरक्षक बिट्टू भाऊ लष्करे, सिने अभिनेता राजेश ननवरे, अभिनेत्री राणी कासलीवाल. मुकूंदपूचेरचे मा.सरपंच अशोकराव उपळकर, नगरसेवक नारायणराव लष्करे,संदिप धनवटे, चिलेखनवाडीचे सरपंच तुकाराम धनवटे,सुभाष पवार,वडार समाज संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष रामचंद्र मंजूळे,सक्षम वडार फाउंडेशनचे अध्यक्ष संदिप कुसळकर ,आदर्श गाव मांजरसुभाचे सरपंच जालींधर कदम,,व्हि.डी. काळे,जनहक्कचे अध्यक्ष विष्णू पवार,
 वडार समाज संघ उत्तरचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर शेलार,मा.चेअरमन संजय माधव काळे, संदिप कुसळकर,सोनई, महेश काळे, मुन्ना लांडगे,मेजर संतोष काळे,ज्ञानेश्वर लांडगे,भाऊसाहेब काळे,भागवत, एकनाथ धनवटे, निलेश गुंजाळ,दत्तात्रय कुसळकर, दत्तात्रय धनवटे, बंटी कुसमुडे,राजू मांडुळे, राधेश्याम कुसमुडे,अनिकेत धनवटे,प्रल्हाद कुसळकर,राजू धनवटे,राजू लष्कर व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशाल जेठे ,निरज जठे, रमेश जेठे,सागर धनवटे यांनी विशेष परिश्रम घेतले.


close