चहा म्हणजे चहा असतो,
कधीही मिळाला तरी वाह वाह असतो...
उन्हाळ्यात थंड, हिवाळयात उष्ण तर पावसाळ्यात बहारदार असतो,
कधीही मिळाला तरी वाह वाह असतो...
मुंबईत तो पिला जातो,
पुण्यात घेतला जातो,
कोल्हापुरात टाकला जातो तर,
नागपुरात तो मांडला जातो,
चहा म्हणजे चहा असतो,
कधीही मिळाला तरी वाह वाह असतो...
क्षण आनंदाचा असो
वा आलेल असो टेंशन,
आळस झटकायला लागतो तसाच
थकवा घालवायला ही लागतो,
चहा म्हणजे चहा असतो,
कधीही मिळाला तरी वाह वाह असतो...
काहीच काम नसताना पण चालतो
आणि खूप काम असलं तरी पण लागतो,
गप्पा मारताना जसा लागतो,
तसाच एकटेपणा मिटवायला ही लागतो,
चहा म्हणजे चहा असतो,
कधीही मिळाला तरी वाह वाह असतो...
चहा ला वेळ नसते पण,
वेळेला चहाच लागतो,
चहा म्हणजे चहा असतो,
कधीही मिळाला तरी वाह वाह असतो...
जागतिक चहा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!