विशाल जेठे यांनी विकसित केलेल्या डिजिटल बॅनर्स स्टुडिओ आणि मोबाईल ॲप्स हिंदू धर्म रक्षक बिट्टू भाऊ लष्करे यांच्या शुभहस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रिबीन कट करून उद्घाटन संपन्न...!


अहिल्यानगर:-
आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगात डिजिटल माध्यमांचा वापर करून सामान्य जनतेपर्यंत सेवा पोहोचवण्याचे कार्य अनेक युवा उद्योजक करत आहेत. अशातच अहिल्या नगर जिल्ह्यातील देहरे गावातील युवा डेव्हलपर विशाल जेठे या युवकाने एक अत्यंत उपयुक्त आणि बहुउद्देशीय मोबाईल ॲप तयार केले आहे आणि आजच्या डिजिटल युगात प्रत्येक व्यवसाय, कार्यक्रम, संस्था किंवा वैयक्तिक ओळख सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध केली जाते. अशावेळी आकर्षक बॅनर, पोस्टर, लोगो आणि विविध ग्राफिक्स डिझाईन यांची मोठी गरज भासते आणि हिच गरज ओळखून 'बॅनर स्टुडिओ' हे एक बहुउद्देशीय आणि उपयुक्त मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहे. 



जी कोणत्याही व्यक्तीला सहज सोप्या पद्धतीने बॅनर डिझाईन करण्याची संधी उपलब्ध करून देते. बॅनर स्टुडिओ ही ॲप विशाल जेठे यांनी स्थानिक पातळीवर निर्माण केली असून ग्रामीण भागातील युवकांना डिजिटल माध्यमांशी जोडण्याचा हा एक प्रेरणादायी प्रयत्न आहे.