shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय संनियंत्रण समितीची बैठकीत मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेचा लाभ त्वरित देण्याची आग्रही मागणी

अमरावती:-
    ज्येष्ठ नागरिक समन्वय संनियंत्रण समितीची बैठक मंगळवार दिनांक   २०/०५/२०२५ ला  दुपारी ४.०० ला मा. दानिश साहेब अप्पर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या सभेला समितीचे सचिव तथा सहाय्यक आयुक्त  श्री राजेंद्र जाधवर , पोलीस आयुक्त   कार्यालयाचे श्री वानखडे साहेब, महानगरपालिकेचे श्री. शिंदे साहेब जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे डॉ.जुबेर साहेब,कार्यालयीन अधिक्षका श्रीमती तायडे मॅडम,सनियंत्रन समितीचे सदस्य मा.श्री.पुरूषोत्तम गांवडे अध्यक्ष पश्चिम विदर्भ प्रादेशिक विभाग  ज्येष्ठ नागरिक महासंघ अमरावती/अकोला,अमरावती, अमरावती जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे अध्यक्ष.श्री. दामोदर पवार, समाज कल्याण विभागाच्या कनिष्ठ लिपीक श्रीमती  उमा टांक आदी सनियंत्रण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

सुरुवातीला माननीय दानिश साहेब अप्पर जिल्हाधिकारी अमरावती या पदावर आरूढ झाल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले त्यानंतर समितीचे सचिव मा. श्री  राजेंन्द्र जाधवर यांनी सभेला उपस्थितांचे शब्द सुमनांनी स्वागत केले. मागिल सभेत ठरल्याप्रमाणे झालेल्या कार्यवाहीचा धावता आढावा घेण्यात आला.शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी  सर्वसमावेशक  धोरण २०१३ प्रमाणे  व शासन निर्णय २०१८ प्रमाणे विविध विभागांनी कृती आराखडा तयार करून त्याची योग्य प्रकारे अमंलबजावणी  व्हावी.  

यामध्ये आरोग्य, नगर विकास, गृहनिर्माण, समाज कल्याण आयुक्तालय, पोलीस विभाग, गृहविभागामार्फत विविध योजना व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यांचा आढावा घेऊन शासनाचे धोरण योग्य प्रकारे राबविल्या जावे यासाठी सनियंत्रण समिती असल्याचे मत श्री पुरुषोत्तम गांवडे व श्री डी.एस.पवार  सभेत व्यक्त केले. तथापि त्याप्रमाणे अमरावती जिल्हात योग्य अंमलबजावणी होत नसल्याची नाराजी दर्शविली. मागील सभेमध्ये घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी  व आजच्या सभेमध्ये झालेल्या चर्चेनुसार सकारात्मक भूमिका घेऊन शासनाचे ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेले धोरण योग्य प्रकारे राबविल्या जाईल अशी शाश्वती सभेत देण्यात आली. जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये अद्यापही ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती स्थापन झालेली नाही. स्थानिक स्तरावरील ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी पोलीस स्टेशन मध्ये गेले असता तेथील ठाणेदार उडवाउडवीचे उत्तर देवुन त्यांना धुडकावून लावतात असा प्रकार योग्य नसल्याचे प्रतिनिधींनी मा. अध्यक्ष यांचे निदर्शनास आणून दिले.  
महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत मार्फत  ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केन्द्र व त्यास लागणारे साहित्य पुरविण्यात यावे, मुख्यमंत्री वयोश्री योजना व तिर्थदर्शन योजनेचा लाभ अमरावती जिल्ह्यातील ज्येष्ठांना अद्याप मिळाला नाही. याबाबत सभेत प्रश्न उपस्थित केला असता मा. जाधवर साहेब यांनी तिर्थदर्शन करिता ज्येष्ठाकडुन १६५० अर्ज प्राप्त झाले आहेत, त्याची छाननी करून जिल्हाचे पालकमंत्री महोदयांकडे प्रस्ताव मंजुरी साठी पाठविला.यावर त्वरित कार्यवाही करण्याचा आग्रह प्रतिनिधींनी केला . 

वयोश्री योजनेतील लाभार्थी यांनी केलेल्या अर्जानुसार परिपूर्ण  असलेले अर्ज मंजूर करुन त्यांना आर्थिक लाभ दिला आहे.काही अर्जामध्ये त्रुटी असल्याने त्यांचेकडून माहिती मागविली आहे.त्यांनाही लवकरच लाभ देण्याचे मान्य केले. सनियंत्रण समितीची सभा तिन महिण्यातुन  एकदा घेण्यात यावी. सभेचा कार्य वृत्तात लवकर देण्यात यावा अशा सूचना सभेत प्रतिनिधी यांनी केल्या. सभेचे मा.अध्यक्ष यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाचे धोरण त्याबाबत  प्रत्येक विभागाने कृती आराखडा तयार करून त्यांची योग्य अमंलबजावणी करण्यासाठी पत्र देवून आढावा घेण्यात येईल अशी शाश्वती दिली. ज्येष्ठ नागरिक सनियंत्रण समितीचे प्रतिनिधींनी सभेत उपस्थित केलेल्या मुद्यावर नियमाप्रमाणे योग्य कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना सभाध्यक्षांनी दिल्या. आजच्या सभेत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली . सभेचे आयोजन व सभेला उपस्थित संनियंत्रण समितीचे अध्यक्ष, सचिव व सदस्यगण यांचे श्री दामोदर पवार यांनी आभार मानले व सभाध्यक्षांचे परवानगीने सभा संपल्याची जाहीर केले  श्री.पी.टी.गावंडे, श्री डी.एस.पवार अमरावती जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय संनियंत्रण समिती यांनी विशेष परिश्रम घेतले .                       
close