पुणे प्रतिनिधी:-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची नुकतीच भेट घेऊन वडार समाजाचे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांची बाब मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली. आणि लेखी निवेदनही देण्यात आले.
विमुक्त भटक्या प्रवर्गात मोडणारा हा वडार समाज प्रगतीच्या स्पर्धेत खूपच मागे पडलेला असून सरकारने या समाजाकडे अतिशय गांभीर्याने लक्ष देण्याची गरज मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिली...
वडार समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी यापुढे मी नक्कीच लक्ष देऊन समाजाला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आश्वासन दिले..
येणाऱ्या काळामध्ये सरकार आणि वडार समाजामध्ये चांगला समन्वय साधण्यासाठी प्रयत्न करा... असे निर्देश साहेबांनी दिले.
याच अनुषंगाने सरकार आणि समाजामध्ये सदृढ समन्वय साधण्याच्या उद्देशाने.दिनांक 18/05/2025 रोजी ठीक सकाळी 10 वाजता ठिकाण: पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन,घोले रोड,शिवाजीनगर पुणे-05
या ठिकाणी राज्यस्तरीय कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केलेली आहे.
कृपया सरकार आणि वडार समाजामध्ये समन्वय साधण्याच्या या प्रयत्नात आपण सर्वांनी सहभागी होऊन वडार समाजाला त्याचे नाय हक्क मिळवून देण्यासाठी योगदान द्यावे. ही अपेक्षा बाळगतो.धन्यवाद.
आयोजक
भरत विटकर
संस्थापक
वडार एकता परिषद